Red Hat Enterprise Linux 5.3

प्रकाशन टिप

सर्व मांडणी करीता प्रकाशन टिप.

Ryan Lerch

Red Hat Engineering Content Services

Legal Notice

Copyright 2008 Red Hat, Inc.. This material may only be distributed subject to the terms and conditions set forth in the Open Publication License, V1.0 or later (the latest version of the OPL is presently available at http://www.opencontent.org/openpub/).

Red Hat and the Red Hat "Shadow Man" logo are registered trademarks of Red Hat, Inc. in the United States and other countries.

All other trademarks referenced herein are the property of their respective owners.

The GPG fingerprint of the security@redhat.com key is:

CA 20 86 86 2B D6 9D FC 65 F6 EC C4 21 91 80 CD DB 42 A6 0E



Abstract

हे दस्तऐवज Red Hat Enterprise Linux 5.3 प्रकाशन टिप विषयी विस्तृत माहिती पुरवितो.


1. प्रतिष्ठापना-संबंधित टिप
1.1. सर्व मांडणी
1.2. PowerPC मांडणी
1.3. s390x मांडणी
1.4. ia64 मांडणी
2. गुणविशेष अद्ययावत
3. ड्राइवर अद्ययावत
3.1. सर्व मांडणी
4. कर्नल-संबंधित टिप
4.1. सर्व मांडणी
4.2. x86 मांडणी
4.3. PowerPC मांडणी
4.4. x86_64 मांडणी
4.5. s390x मांडणी
4.6. ia64 मांडणी
5. आभासीकरण
5.1. गुणविशेष अद्ययावत
5.2. निर्धारीत अडचणी
5.3. परिचीत अडचणी
6. तंत्रज्ञाण पूर्वदृश्य
7. निर्धारीत अडचणी
7.1. सर्व मांडणी
7.2. x86_64 मांडणी
7.3. s390x मांडणी
7.4. PowerPC मांडणी
8. परिचीत अडचणी
8.1. सर्व मांडणी
8.2. x86 मांडणी
8.3. x86_64 मांडणी
8.4. PowerPC मांडणी
8.5. s390x मांडणी
8.6. ia64 मांडणी
A. आवृत्ती इतिहास

या विभागात Anaconda व Red Hat Enterprise Linux 5.3 प्रतिष्ठापना संबंधित माहिती समाविष्टीत आहे.

Red Hat Network नविन व बदलविले संकुल प्रतिष्ठापीत करू शकतो व Red Hat Enterprise Linux 5 प्रणाली करीता सुधारणा करू शकतो. वैकल्पिकरित्या, Anaconda वर्तमान Red Hat Enterprise Linux 5 प्रणालीस सुधारीत करू शकतो किंवा Red Hat Enterprise Linux 5.3 चे नविन प्रतिष्ठापन कार्यान्वीत करू शकतो.

लक्षात ठेवा: Red Hat Enterprise Linux 5.3 च्या बीटा प्रकाशन पासून GA प्रकाशन करीता सुधारणाना करतेवेळी समर्थन पुरविले जाणार नाही.

पुढे, जरी Anaconda Red Hat Enterprise Linux च्या पूर्वीच्या प्रमुख आवृत्तींना Red Hat Enterprise Linux 5.3 अशी सुधारणा करण्याचा पर्याय पुरवित असल्यावरही, Red Hat वर्तमानक्षणी यांस समर्थन पुरवित नाही. असे ही, Red Hat Enterprise Linux प्रमुख आवृत्ती मधिल सुधारणा करीता समर्थन Red Hat द्वारे पुरविले जात नाही. (मुख्य आवृत्तीस पूर्णतया आवृत्ती क्रमांकसह दर्शविले जाते. उदाहरणार्थ, Red Hat Enteprise Linux 4 व Red Hat Enterprise Linux 5 हे दोन्ही Red Hat Enterprise Linux ची मुख्य आवृत्ती आहे.)

मुख्य प्रकाशन मधिल सुधारणा प्रणालीवरील सर्व संयोजना, सेवा किंवा इच्छिक संयोजना संचयीत करून ठेवत नाही. परिणाम स्वरूप, Red Hat मुख्य आवृत्ती पासून इतर आवृत्ती करीता सुधारणा करतेवेळी पूर्णतया नविन प्रतिष्ठापन करा असे ठामपणे सूचवितो.

1.1. सर्व मांडणी

  • Anaconda चे पाठ्य पद्धती प्रतिष्ठापन आता पूर्णतया प्रतिष्ठापन करीता Virtual Network Computing (VNC) सुविधा पुरवितो.

  • एनक्रीप्टेड सॉफ्टवेअर RAID डिस्क बनविणे किंवा त्याचा वापर करण्यास (म्हणजे software RAID विभाजन) समर्थन पुरविले जात नाही. तरी, एनक्रीप्टेड सॉफ्टवेअर RAID अररे बनविण्यास (e.g. /dev/md0) समर्थन पुरविले जाते.

  • RHEL5 करीता मुलभूत NFS "locking" असे आहे. यामुळे, anaconda तील %post विभाग पासून nfs सहभाग माऊन्ट करायचे असल्यास, mount -o nolock,udp आदेशचा वापर nfs सहभाग माऊन्ट करण्यापूर्वी डिमन कुलूपबंद करण्यासाठी करा.

  • iBFT-संयोजीत संजाळ साधन सक्षम प्रणावीवरील CD-ROM किंवा DVD-ROM प्रतिष्ठापीत करतेवेळी, Anaconda कुठलेही iBFT-संयोजीत संचयन साधन तोपर्यंत समाविष्ट करणार नाही जोपर्यंत संजाळ संयोजीत केले जात नाही. प्रतिष्ठापन करीता संजाळ कार्यान्वीत करतेवेळी, प्रतिष्ठापन बूट प्रॉम्पट वर linux updates=http://[any] चालवा. लक्षात ठेवा [any] कुठल्याही URL सह बदलविल् जाऊ शकते.

    तुमच्या प्रणालीस IP संयोजनाची आवश्यकता असल्यास, linux updates=http://[any] ip=[IP address] netmask=[netmask] dns=[dns] आदेशचा वापर करा.

  • पूर्णतया आभासी अतिथी खात्यावरील Red Hat Enterprise Linux 5.3 प्रतिष्ठापीत करतेवेळी, kernel-xen कर्नलचा वापर करू नका. या कर्नलचा पूर्णतया आभासी अतिथीवर चालविल्यास प्रणाली स्तब्ध होऊ शकते.

    पूर्णतया आभासी अतिथी खात्यावरील Red Hat Enterprise Linux 5.3 चे प्रतिष्ठापन करतेवेळी प्रतिष्ठापन क्रमांकाचा वापर करत असाल्यास, आभासीकरण संकुल समुह निवडायचा नाही याची खात्री करा. आभासीकरण संकुल समुह पर्याय kernel-xen कर्नलचे प्रतिष्ठापन करतो.

    लक्षात घ्या अप्रत्यक्षित अतिथी खात्यांवर याचा प्रभाव पडत नाही. अप्रत्यक्षित अतिथी खात्यांवर नेहमी kernel-xen कर्नलचा वापर केला जातो.

  • Red Hat Enterprise Linux 5 चे 5.2 अशी सुधारणा करतेवेळी आभासी कर्नलचा वापर करत असाल्यास, सुधारणा पूर्ण झाल्यावर संगणक पुन्हा सुरू करा. पुढे प्रणाली बूट करण्याकरीता तुम्ही अद्ययावतीत आभासी कर्नलचा वापर करू शकता.

    Red Hat Enterprise Linux 5 व 5.2 चे हायपरवाइजर ABI-सहत्व नाही. अद्ययावतीत आभासी कर्नलचा वापर करून सुधारणा केल्यावर प्रणाली बूट करायला विसरल्यास, सुधारीत आभासी RPM कार्यरत कर्नलशी जुळणार नाही.

  • Red Hat Enterprise Linux 4.6 पासून Red Hat Enterprise Linux 5.3 किंवा पुढिल आवृत्ती करीता सुधारणा करतेवेळी, gcc4 सुधारणा करण्यापासून अपयशी ठरू शकते. तरी, सुधारणा करण्यापूर्वी gcc4 संकुल यांस स्वतः काढून टाकायला हवे.

  • firstboot भाषा प्लगईन काढूण टाकण्यात आले आहे, कारण नविन भाषा निवडल्यावर ते प्रणालीस पूर्णपणे प्रतिष्ठापीत व पुन्ह संयोजीत करत नाही.

  • प्रतिष्ठापनवेळी Challenge Handshake Authentication Protocol (CHAP) चा वापर समर्थित नाही. तरी, CHAP ला प्रतिष्ठापन नंतरच कार्यान्वीत केले पाहिजे.

    प्रणाली iFBT साधनसह बूट होत असल्यास, iBFT BIOS/firmware मांडणी पडद्यावरील CHAP संयोजीत करा. पुढिल बूटवेळी तुमचे CHAP संयोजना वापरले जातिल.

    तुमची प्रणाली PXE iSCSI सह बूट होत असल्यास, CHAP ला iscsiadm सह संयोजीत करा. संयोजन केल्यावर, mkinitrd ची वापरणी तुमच्या CHAP संयोजना मध्ये पुढच्या बूटवेळी वापरली जाईल याची खात्री करून घ्या.

  • प्रतिष्ठापनवेळी अतिथी व्यवस्थापन पहातेवेळी, अतिथी करीता RHN साधन पर्याय उपलब्ध होणार नाही. असे झाल्यास, प्रणालीला अगाऊ शिर्षक, dom0 द्वारे वापरले गेलेले शिर्षक पेक्षा वेगळे शिर्षकाची आवश्यकता लागेल.

    अतिथी करीता अगाऊ शिर्षकाचे समावेषण रोखण्याकरीता, Red Hat Network प्रणालीवर पंजीकृत करण्यापूर्वी rhn-virtualization-common संकुल स्वत: प्रतिष्ठापीत करा.

  • प्रणालीवर Red Hat Enterprise Linux 5.3 चे प्रतिष्ठापन केल्याने बहु संजाळ संवाद व स्वयंहस्ते निर्देशीत IPv6 पत्ता यामुळे अपुरे व अयोग्यरित्या संजाळ संयोजनास कारणीभूत ठरू शकते. असे झाल्यास, तुमची IPv6 संयोजना प्रतिष्ठापीत प्रणालीवर दर्शविले जाऊ शकणार नाही.

    यावर उपाय म्हणून, NETWORKING_IPV6 यास yes असे /etc/sysconfig/network अंतर्गत निश्चित करा. त्यानंतर, तुमची संजाळ जुळवणी service network restart आदेशचा वापर करून पुन्हा सुरू करा.

  • प्रणालीवर yum-rhn-plugin-0.5.2-5.el5_1.2 (किंवा पूर्वीची आवृत्ती) प्रतिष्ठापीत असल्यास, तुम्ही Red Hat Enterprise Linux 5.3 करीता yum update द्वारे सुधारणा करू शकता. हे कार्यान्वीत करण्याकरीता, yum-rhn-plugin यांस अलिकडील आवृत्ती (yum update yum-rhn-plugin चा वापर करून) करीता yum update चालविण्यापूर्वी सुधारीत करा.

  • पूर्वी, anaconda 8 पेक्षा जास्त SmartArray कंट्रोलर करीता प्रवेश प्राप्त करू शकला नाही. या अद्ययावत अंतर्गत, या अडचणचे निर्धारण केले गेले आहे.

  • ड्राइवर डिस्क, OEM द्वारे पुरविलेले, एक प्रतिमा फाइल (*.img) आहे, ज्यात संभाव्य बहु ड्राइवर संकुल व कर्नल विभाग समाविष्टीत आहे. या ड्राइवरचा वापर प्रतिष्ठापनवेळी हार्डवेअर करीता समर्थन पुरविण्याकरीता केला जातो जे सहसा Red Hat Enterprise Linux 5 द्वारे ओळखले जात नाही. प्रणालीवर एकदा ड्राइवर संकुल व कर्नल विभाग प्रतिष्ठापीत केल्यावर, त्यांस initial RAM disk (initrd) येथे स्थापीत केले जाते ज्यामुळे प्रणाली बूट झाल्यावर त्याचे दाखलन होते.

    या प्रकाशनसह, प्रतिष्ठापन आपोआप ड्राइवर डिस्क शोधू शकतो (फाइल प्रणाली लेबलवर आधारीत), ज्यामुळे प्रतिष्ठापनवेळी या डिस्कतील अनुक्रमाचा वापर केला जातो. हे वर्तन प्रतिष्ठापन आदेश ओळ पर्याय dlabel=on द्वारे नियंत्रीत केले जाते, जे आपोआप शोध कार्यान्वीत करते. या प्रकाशन करीता dlabel=on मुलभूत संयोजना आहे.

    OEMDRV फाइल प्रणाली लेबल असलेले सर्व ब्लॉक साधनचे विश्लेषण केले जाते व ड्राइवर त्यानुरूप जसे आढळले जाते तसे साधन पासून दाखल केले जाते.

  • वर्तमान एनक्रीप्ट केलेले ब्लॉक साधन ज्यात vfat फाइल प्रणली समाविष्ट आहे विभाजन संवाद अंतर्गत foreign यानुरूप दर्शविले जाईल; तरी, प्रणाली बूटवेळी हे साधन आपोआप आरोहीत केले जाऊ शकत नाही. अशा प्रकारचे साधन आपोआप आरोहीत केले जातिल याची खात्री करण्याकरीता, /etc/fstab येथे योग्य नोंदणी करा. अधिक माहिती करीता, man fstab पहा.

1.2. PowerPC मांडणी

  • Red Hat Enterprise Linux 5.2 प्रतिष्ठापन करीता किमान 1GB RAM ची आवश्यकता आहे; सूचविलेले RAM 2GB आहे. मशीनकडे 1GB पेक्षा कमी RAM असल्यास, प्रतिष्ठापन स्तब्ध होते.

    पुढे, 1 GB पेक्षा कमी RAM असलेले PowerPC-आधारीत मशीन RAM-केंद्रीत वर्कलोडवेळी कठोर कार्यक्षमता समस्या अनुभवतात. Red Hat Enterprise Linux 5.2 साठी RAM-केंद्रीत कार्यपद्धती कार्य करण्याकरीता वैक्लपिकरित्या, 4 GB RAM सूचविले जाते. यामुळे 512MB RAM व त्यावरील Red Hat Enterprise Linux 4.5 किंवा पूर्वीचे आवृत्ती असलेले प्रणालीवर समान फिसीकल पेज आहे याची खात्री होते.

1.3. s390x मांडणी

  • anaconda आता OSA Express3 cards करीता CHPID वरील दोन्ही पोर्ट करीता समर्थन पुरवितो. प्रतिष्ठापक प्रतिष्ठापनच्या प्रारंभ क्षणी पोर्ट क्रमांक करीता विचारतो. पोर्ट करीता पुरविले गेलेले मुल्यचा प्रभाव प्रतिष्ठापीत संजाळ संवाद startup स्क्रीप्टवर देखील पडतो. पोर्ट 1 निवडल्यास, ifcfg-eth* फाइलच्या पर्याय बाब करीता मुल्य portno=1 जोडले जाते.

    Note

    z/VM अंतर्गत प्रतिष्ठापन करतेवेळी, तुम्ही CMS संयोजना फाइल अंतर्गत PORTNO=0 (पोर्ट 0 वापरण्याकरीता) किंवा PORTNO=1 (पोर्ट 1 वापरण्याकरीता) जोडू शकता.

  • DASD ब्लॉक साधन वरील वर्तमान Linux किंवा विना-Linux फाइलप्रणालीमुळे इनस्टॉलर स्तब्ध होऊ शकते. असे झाल्यास, DASD साधन वरील वापरण्याजोगी वर्तमान सर्व विभाजन नष्ट करणे आवश्यक आहे.

1.4. ia64 मांडणी

  • प्रणालीवर फक्त 512MB RAM असल्यावर, Red Hat Enterprise Linux 5.3 चा प्रतिष्ठापनाचा प्रयत्न अपयशी ठरेल. हे टाळण्याकरीता, मुळ प्रतिष्ठापन प्रथम कार्यान्वीत करा व इतर संकुलचे प्रतिष्ठापन प्रतिष्ठापन पूर्ण झाल्यावर करा.

  • 32-बीट सहत्वता लेयर डिस्क पासून संकुल प्रतिष्ठापन करीता yum चा वापर केल्यास अपयशी ठरू शकते. हे सहसा, Red Hat संकुलची स्वाक्षरी कि यांस RPM माहितीकोष अंतर्गत इम्पोर्ट केले गेले नाही. हे सहसा Red Hat Network शी जुळवणी स्थापीत न केल्यामुळे व अद्ययावत प्राप्त न केल्यामुळे होते. कि स्वयंरित्या इम्पोर्ट करण्याकरीता, खालिल आदेश रूट म्हणून चालवा:

    rpm --import /etc/pki/rpm-gpg/RPM-GPG-KEY-redhat-release

    Red Hat GPG कि एकदा इम्पोर्ट केल्यावर, तुम्ही 32-bit Compatibility Layer डिस्क पासून yum चा वापर संकुल प्रतिष्ठापन करण्याकरीता करू शकता.

    लक्ष्यात घ्या डीस्कपासून प्रतिष्ठापन करतेवेळी, rpm च्या व्यतिरिक्त मूलभूत OS वर अवलंबून असणारे संकुलही प्रतिष्ठापनेवेळी गृहीत धरण्याकरीता आपण yum चा वापर करावा असे सुचविले जाते.

2. गुणविशेष अद्ययावत

ब्लॉक साधन एनक्रीप्शन

Red Hat Enterprise Linux 5.3 यात Linux Unified Key Setup (LUKS) चा वापर करून ब्लॅक साधन एन्क्रिप्शन करीता समर्थन पुरविले गेले आहे. साधनास एन्क्रिप्ट केल्यास ब्लॉक साधन वरील सर्व अनाधिकृत प्रवेश विरूद्ध सुरक्षीत करतो, जरी साधन वास्तविकरित्या प्रणालीतून काढून टाकले गेले आहे. एन्क्रिप्टेड साधन अनुक्रमच्या प्रवेश करीता, वापरकर्ताने गुप्तवाक्य किंवा अधिप्रमाणन करीता कि पुरविली पाहिजे.

डिस्क एन्क्रीपशन संयोजन विषयी माहिती करीता, Red Hat Enterprise Linux प्रतिष्ठापन पुस्तिकातील भाग 28: http://redhat.com/docs/ येथे पहा

mac80211 802.11a/b/g WiFi प्रोटोकॉल स्टॅक (mac80211)

mac80211 स्टॅक (पूर्वी यास devicescape/d80211 स्टॅक म्हटले जात असे) आता Red Hat Enterprise Linux 5.3 अतर्गत समर्थीत गुणविशेष आहे. ते iwlwifi 4965GN वायरलेस ड्राइवर Intel® WiFi Link 4965 हार्डवेअर करीता कार्यान्वीत करते ज्यामुळे वायरलेस साधन कुठल्याही WiFi संजाळशी जुळवणी स्थापीत करण्यास मदत प्राप्त होते.

जरी mac80211 घटक करीता Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत समर्थन पुरविले असले, तरी कर्नल करीता बोधचिन्ह वाइटलिस्ट मध्ये बोधचिन्हाचे समावेशण केले जात नाही.

Global File System 2 (GFS2)

GFS2 ही GFS ची एक वाढीव सुधारणा आहे. हे अद्ययावत बरेच डिस्क-वरील फाइल प्रणाली ज्यांस ऑन-डिस्क फाइल प्रणाली बदलविण्याची आवश्यकता आहे, त्यांस लागू होते. GFS फाइल प्रणाली gfs2_convert चा वापर करून GFS2 मध्ये रूपांतरीत केले जाऊ शकते, ज्यामुळे GFS फाइल प्रणालीचा मेटाडेटा परस्पररित्या अद्ययावत होतो.

Red Hat Enterprise Linux 5.2, GFS2 ला विश्लेषण कारणास्तव कर्नल विभाग म्हणून पुरविले गेले. Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत, GFS2 आता कर्नल संकुलचे भाग आहे. Red Hat Enterprise Linux 5.2 GFS2 कर्नल विभाग प्रतिष्ठापीत केले असल्यास त्याला Red Hat Enterprise Linux 5.3 अतंर्गत GFS2 वापरण्याकरीता काढून टाकायला हवे.

ड्राइवर डिस्क समर्थन मधिल सुधारणा

ड्राइवर डिस्क, OEM द्वारे पुरविलेले, एकमेव प्रतिमा फाइल आहे (*.img), ज्यात संभाव्य बहु ड्राइवर RPMs व कर्नल विभाग समाविष्टीत आहे. या ड्राइवरचा वापर प्रतिष्ठापनवेळी हार्डवेअर ओळखण्याकरीता केला जातो. RPMs प्रणालीवर प्रतिष्ठापीत केल्यावर initrd अंतर्गत स्थीत केले जाते ज्यामुळे मशीन सुरू केल्यावर त्यांस समर्थन प्राप्त होते.

Red Hat Enterprise Linux 5.3 सह, प्रतिष्ठापन आपोआप फाइल प्रणाली लेबलवर आधारीत ड्राइवर डिस्क ओळखू शकतो, व प्रतिष्ठापनवेळी डिस्क वरील अनुक्रमचा वापर करू शकतो. हे वर्तन प्रतिष्ठापन आदेश ओळ पर्याय dlabel=on द्वारे नियंत्रीत केले जाते, जे स्वयं शोध कार्यान्वीत करते. OEMDRV फाइल प्रणाली लेबेल असलेले सर्व ब्लॉक साधनांचे विश्लेषण केले जाते व ड्राइवर या साधन पासून ज्यानुरूप आढळते त्यानुरूप दाखल केले जाते.

iSCSI बूट फर्मवेअर टेबल

Red Hat Enterprise Linux 5.3 आता पूर्णतया iSCSI Boot Firmware Table (iBFT) करीता समर्थन पुरवितो जे iSCSI साधन पासून बूट करण्यास परवानगी देतो. या समर्थन करीता iSCSI डिस्क (nodes) यांस स्टार्टअपवेळी आपोआपरित्या चिन्हाकृत करण्याची आवश्यकता नाही; प्रतिष्ठापीत प्रणाली आपोआप runlevel 3 किंवा 5 करीता प्रवेश करतेवेळी iSCSI डिस्कशी जुळवणी व दाखलन करण्याची आवश्यकता नाही.

iSCSI सहसा रूट फाइलप्रणाली करीता वापरले जाते, ज्यामुळे अशा बदलावांचे प्रभाव पडत नाही कारण initrd जुळवणी स्थापीत केल्यावर आवश्यक रनलेवल करीता प्रवेश करण्यापूर्वीच iSCSI डिस्कवर दाखलन करतो.

तरी iSCSI डीस्क विना रूट संचयीका येथे आरोहीत करणे आवश्यक आहे, उदाहरण /home किंवा /srv असल्यास, या बदलावांचा प्रभाव पडू शकतो, कारण प्रतिष्ठापीत प्रणली यापुढे स्वयंरित्या iSCSI डिस्कशी ज्याचा वापर रूट फाइल प्रणाली करीता केला जात नाही, जुळवणी व दाखलन करू शकणार नाही.

विना रूट संचयीका वर आरोहीत iSCSI डिस्कचा वापर अजूनही शक्य आहे, परंतु त्यास खालिल गोष्टी कार्यान्वीत करण्याची आवश्यकता आहे:

  1. Install the system without use of iSCSI disks mounted on non root directories and later configure the relevant disks and mount points manually

  2. प्रतिष्ठापीत प्रणालीस रनलेवल 1 अंतर्गत बूट करा, व कुठलेही iSCSI डिस्क ज्याचा वापर रूट फाइल प्रणाली करीता केला जात नाही त्यांस स्वयं प्रारंभ करीता खालिल आदेशचा दर डिस्क करीता वापर करून चिन्हाकृत करा:

    iscsiadm -m node -T target-name -p ip:port -o update -n node.startup -v automatic

rhythmbox

rhythmbox ऑडिओ प्लेयर आवृत्ती 0.11.6 करीता अद्ययावतीत केले गेले आहे. हे अद्ययावत मालकीय GStreamer प्लगइन वापरण्याकरीता पर्याय पुरवितो.

lftp Rebase

lftp आता आवृत्ती 3.7.1 करीता पुन्ह संयोजीत करण्यात आले आहे. यात अनेक अपस्ट्रीम गुणविशेष करीता अद्ययावत व बग निर्धारण समाविष्टीत आहे, खालिल देखील आहे:

  • ज्या स्वरूपाने mirror --script (ज्यामुळे विना अधिप्रमाणीत हक्कांचे उल्लंगन होते) याचा वापर करून lftp quoted scripts दर्शवितो, त्यातील सुरक्षा दोष आता निर्धारीत करण्यात आले आहे.

  • lftp ला पर्याय -c सह वापरल्यास lftp यापुढे सत्बध होत नाही.

  • sftp चा वापर करतेवेळी lftp स्थानांतरनवेळी यापुढे फाइल सदोषीत करत नाही.

या प्रकाशन करीता लागू केलेले अद्ययावत विषयी अधिक माहिती करीता lftp, http://lftp.yar.ru/news.html पहा.

TTY इन्पुट ऑडिटींग

TTY इन्पुट ऑडिटींग करीता आता समर्थन पुरविले जाते. कार्यपद्धती TTY इन्पुट ऑडिटींग करीता चिन्हाकृत केले असल्यास, माहिती TTYs पासून वाचन केलेली माहितीचे ऑडिट केले जाते; हे ऑडिट रेकॉर्ड येथे TTY प्रकार नुरूप दर्शविले जाईल.

pam_tty_audit विभागाचा वापर TTY इन्पुट ऑडिटींग करीता कार्यपद्धती (व उपकार्यपद्धती) चिन्हाकृत करण्याकरीता केला जातो. हे कार्य करण्यासाठी सूचनांकरीता, man pam_tty_audit(8) पहा.

TTY ऑडिट रेकॉर्ड अंतर्गत ऑडिट कार्यपद्धती द्वारे वाचलेले हुबेहु किस्ट्रोक समाविष्टीत असतात. डिकोडींग सोपे करण्याकरीता, bash रेकॉर्ड प्रकार USER_TTY चा वापर करून हुबेबु आदेश ओळ ऑडिट करतो.

"TTY" ऑडिट रेकॉर्ड अंतर्गत ऑडिट कार्यपद्धती द्वारे TTY पासून वाचले गेलेली सर्व माहिती समाविष्टीत असते. यात इन्पुट स्ट्रीम अंतर्गत TIOCSTI ioctl प्रणाली कॉल द्वारे अंतर्भूत केलेली माहिती समाविष्टीत आहे.

SystemTap Re-base

SystemTap यांस आवृत्ती 0.7.2 नुरूप आधारीत केले गेले आहे. SystemTap च्या या अद्ययावतात मुख्य गुणविशेषसह, अनेक लहान सुधारणा समाविष्ट केले गेले आहे.या गुणविशेष अंतर्गत खालिल समाविष्टीत आहे:

  • SystemTap आता x86, x86-64 व PowerPC मांडणी वरील बोधचिन्ह शोध करीता समर्थन पुरविते. यामुळे SystemTap स्क्रिप्टला वापरकर्ता-क्षेत्र व सहभागीय लायब्ररी करीता शोध कार्यान्वीत करणे शक्य होते. परिणामस्वरूपी, SystemTap आता समान स्थरचे डिबगर शोध वापरकर्ता-क्षेत्र अनुप्रयोग करीता कर्नल शोध नुरूप पुरवितो.

    उदाहरणार्थ, coreutils-debuginfo प्रतिष्ठापीत असल्यास, तुम्ही ls चा callgraph ची देखिल छपाई करू शकता व त्याकरीता /usr/share/doc/systemtap-version/examples/general/callgraph.stp याचा वापर केला जाऊ शकतो:

    stap para-callgraph.stp 'process("ls").function("*")' -c 'ls -l'

    बायनरी व debuginfo RPMs अंतर्गत न आढळलेले आवृत्ती फरक कमी करायचे असल्यास, Red Hat SYSTEMTAP_DEBUGINFO_PATH वातावरण वेरीयेबल +:.debug:/usr/lib/debug:build मुल्य करीता निश्चित करण्यास सूचवितो.

    बोधचिन्ह शोध करीता SystemTap चे समर्थन आता या प्रकाशनातील कर्नल अंतर्गत मार्कर करीता सुद्धा विस्तारीत केले गेले आहे. या मार्करचा वापर करण्यासाठी, kernel-trace कर्नल विभाग /etc/rc.local येथे दाखल करा (modprobe kernel-trace याचा वापर करा).

  • SystemTap दूरस्थ कंपाइलेशन सेवा करीता सुद्धा समर्थन पुरवितो. यामुळे संजाळवरील संगणक स्थानीय SystemTap क्लाऐंट करीता debuginfo/compiler सर्वर म्हणून कार्यान्वीत करतो. mDNS (avahi) चा वापर करून क्लाऐन्ट आपोआप सर्वरचे स्थान निश्चित करतो, व कार्यरत राहण्याकरीता फक्त systemtap-clientsystemtap-runtime संकुलांची आवश्यकता लागते.

    याक्षणी, हे गणविशेष सुरक्षा पद्धती जसे की एनक्रिप्शनचा वापर करत नाही. तरी, दूरस्थ कंपाइलेशन सेवेचा वापर विश्वासर्ह संजाळ अंतर्गत करण्यास सूचविले जाते. अधिक माहिती करीता, man stap-server पहा.

  • या प्रकाशन करीता कर्नल अद्ययावत अंतर्गत कर्नल API विस्तारणचे समावेषण केले गेले आहे जे यशस्वीरित्या शटडाऊन किंवा SystemTap स्क्रिप्टची सुधारणा करते. जोडलेले अगाऊ कर्नल API विस्तारण स्वतंत्र शोध करीता अनावश्यक सहत्वता काढून टाकते. यामुळे, SystemTap स्क्रिप्टतील शंभरहून अधिक कर्नल शोधचे विश्लेषण जलदरित्या केले जाते.

    हे सहसा प्रशासक जे वाइल्डकार्ड समाविष्टीत स्क्रिप्टचा वापर अनेक कर्नल घटना, जसे की probe syscall.* {} प्राप्त करण्याकरीता करतात, त्यांकरीता उपयोगी ठरतो.

SystemTap अद्ययावतच्या पूर्ण यादी करीता, खालिल URL पहा:

http://sources.redhat.com/git/gitweb.cgi?p=systemtap.git;a=blob_plain;f=NEWS;hb=rhel53

क्लस्टर व्यवस्थापक अद्ययावत

Cluster Manager कार्यक्रम (cman) आता आवृत्ती 2.0.97 करीता अद्ययावतीत केले गेले आहे. यात अनेक बग निर्धारण व सुधारणा समाविष्टीत केले गेले आहे, मुख्यतया:

  • cman आता खालिल फर्मवेअर आवृत्ती: APC AOS v3.5.7 व APC rpdu v3.5.6 याचा वापर करते. यामुळे APC 7901 ला simple network management protocol (SNMP) चा योग्य वापर करणारे बगचे निर्धारण होते.

  • fence_drac, fence_ilo, fence_egenera, व fence_bladecenter ऐजन्ट आता ssh करीता समर्थन पुरवितात.

  • fence_xvmd कि फाइल आता पुन्ह प्रारंभ विना पुन्ह दाखल केले जाऊ शकतात.

  • fence कार्यपद्धती आता 8 fence साधन करीता समर्थन पुरवू शकते.

sudo Re-base

sudo अपस्ट्रीम आवृत्ती 1.6.9 यानुरूप आधारीत केले गेले आहे. sudo ची ही आवृत्ती आता LDAP करीता समर्थन पुरविते, व sudo हक्क करीता मुळ शोध (म्हणजे फक्त वृक्ष-स्थर) ऐवजी उप-वृक्ष शोध करीता परवानगी देतो. यामुळे प्रशासक sudo हक्क वृक्ष स्वरूपात विभाजीत करू शकतो, व तसेच वापरकर्ताचे हक्क सोपेरित्या नियंत्रीत करतो.

RPM Re-Base

RedHat Package Manager (RPM) आता Fedora 9 अपस्ट्रीम आवृत्ती यानुरूप आधारीत केले गेले आहे. rpm आता द्वितीय मांडणी-केंद्रीत मॅक्रो फाइल multi-arch प्रणालीशी जोडते. याच्या व्यतिरीक्त, rpm आता Red Hat Enterprise Linux 5 अंतर्गत समावेशण करीता सर्व प्रमाणपत्र आवश्यकता पुरवितो.

या अद्ययावतात अनेक अपस्ट्रीम सुधारणा व rpm करीता बग निर्धारण समाविष्टीत आहे, प्रमुख्याने:

  • rpm यापुढे अनावश्यक .rpmnew.rpmsave फाइल multi-arch प्रणालीवर निर्माण करत नाही.

  • rpm अंतर्गत rpmgiNext() कार्यपद्धतीतील बगमुळे योग्य त्रुटी कळविणे शक्य नव्हते. या अद्ययावतात त्रुटी कळविण्याकरीता योग्य रचना लागू केले गेले आहे, ज्यामुळे सर्व घटना अंतर्गतrpm योग्य exit कोड पाठवितो याची खात्री होते.

Open Fabrics Enterprise Distribution (OFED) / opensm

opensm यांस अपस्ट्रीम आवृत्ती 3.2 करीता अद्ययावतीत केले गेले आहे, व यात opensm लायब्ररी API अंतर्गत लहान बदलाव समाविष्टीत आहे.

  • opensm.conf फाइलचे स्वरूपन बदलविले गेले आहे. अस्तित्वातील opensm.conf करीता इच्छिक बदलाव केले असल्यास, rpm स्वयंरूपी नविन opensm.conf फाइल /etc/ofed/opensm.conf.rpmnew येथे प्रतिष्ठापीत करते. बदलाव या फाइल अंतर्गत स्थानांतरीत करावे लागेल व वर्तमान opensm.conf फाइलला परिणामसह बदलावे लागेल.

  • Red Hat अपस्ट्रीम Open Fabrics Enterprise Distribution (OFED) कोड बेसवर जवळुन लक्ष्य ठेवतो व या नविन तंत्रज्ञाणच्या कमाल सुधारणा स्तर पुरवितो. यामुळे, Red Hat अपस्ट्रीम प्रकल्पच्या आवश्यकता नुरूप किरकोळ प्रकाशन करीता API/ABI सहत्वता संग्रहीत करू शकतो. ही पद्धत Red Hat Enterprise Linux च्या सर्वसाधारण विकास पद्धती पेक्षा वेगळे आहे.

    यामुळे, OFED स्टॅकच्या (खालिल दर्शविल्यानुरूप) वर बांधले गेलेले अनुप्रयोगांस, Red Hat Enterprise Linux च्या किरकोळ प्रकाशन पासून नविन प्रकाशन करीता स्थानांतरीत होतेवेळी रिकंपाइलेशन किंवा स्त्रोत-स्तरीय कोड बदलावची आवश्यकता असू शकते.

    हे सहसा Red Hat Enterprise Linux सॉफ्टवेअर स्टॅकवर बांधले गेलेले अन्य अनुप्रयोग द्वारे आवश्यक नसते. प्रभावीत घटक खालिल नुरूप आहेत:

    • dapl

    • compat-dapl

    • ibsim

    • ibutils

    • infiniband-diags

    • libcxgb3

    • libehca

    • libibcm

    • libibcommon

    • libibmad

    • libibumad

    • libibverbs

    • libipathverbs

    • libmlx4

    • libmthca

    • libnes

    • librmdacm

    • libsdp

    • mpi-selector

    • mpitests

    • mstflint

    • mvapich

    • mvapich2

    • ofed-docs

    • openib

    • openib-mstflint

    • openib-perftest

    • openib-tvflash

    • openmpi

    • opensm

    • perftest

    • qlvnictools

    • qperf

    • rds-tools (भविष्य)

    • srptools

    • tvflash

Net-SNMP Re-Base

Net-SNMP यांस अपसट्रीम आवृत्ती 5.3.2.2 नुरूप आधारीत केले गेले आहे. हे अद्ययावत Stream Control Transmission Protocol (SCTP) समर्थन जोडते (RFC 3873 नुरूप, http://www.ietf.org/rfc/rfc3873.txt) व दोन नविन संयोजना पर्यायचा उल्लेख करते (ज्याचा वापर /etc/snmpd.conf येथे केला पाहिजे):

  • dontLogTCPWrappersConnects -- जुळवणी स्थापना करीता लॉगऑफचे प्रयत्न नाहीसे करते.

  • v1trapaddress -- प्रशासकाला बाह्य SNMP ट्रॅप अंतर्गत एजन्टचा IP पत्ता निश्चित करण्याकरीता परवानगी देतो.

या अद्ययावतात बरेच अपस्ट्रीम बगचे निर्धारण समाविष्टीत आहे, मुख्यतया:

  • snmpd डिमन आता 255 पेक्षा जास्त संजाळ संवाद असलेल्या प्रणालीवर योग्यरित्या कार्य करते. याच्या व्यतिरीक्त, snmpd यांस 65535 पेक्षा जास्त पोर्टशी संयोजीत केल्यावरही त्रुटी दर्शविले जाते.

  • /proc पासून वाचन करतेवेळी race condition ज्यामुळे snmpd डिमनला फाइल डिस्क्रीप्टर लीक करण्यास कारणीभूत ठरले आता त्याचे निर्धारण करण्यात आले आहे.

  • snmpd डिमन आता योग्यरित्या hrProcessorLoad object IDs (OID) कळवितो, multi-CPU हार्डवेअर करीता सुद्धा. लक्षात ठेवा, तरी डिमन स्टार्टअप पासून OID मुल्याची गणना करण्याकरीता एक मिनीट लागते.

  • net-snmp-devel संकुल आता lm_sensors-devel संकुलांवर अवलंबून आहे.

FIPS प्रमाणपत्र करीता OpenSSL Re-Base

openssl संकुल OpenSSL लायब्ररीला नविन अपस्ट्रीम आवृत्तीशी सुधारीत करते, जे वर्तमानक्षणी Federal Information Processing Standards (FIPS-140-2) तपासणी कार्यपद्धतीतून जात आहे. FIPS पद्धती मुलभूतरित्या अकार्यान्वीत केले जाते, यामुळे OpenSSL लायब्ररी गुणविशेष पॅरिटी नियंत्रीत राहते व Red Hat Enterprise Linux 5 अंतर्गत openssl संकुलचे पूर्वीच्या प्रकाशनशी ABI सहत्वता जपण्याची खात्री निश्चित होते.

या अद्ययावतात खालिल अपस्ट्रीम निर्धारण देखिल समाविष्टीत आहे:

  • मुलभूतरित्या, zlib संकुचन याचा वापर SSL व TLS जुळवणी करीता केला जातो. Central Processor Assist for Cryptographic Function (CPACF) सह IBM System z मांडणी वर, संकुचन CPU लोडचे मुख्य भाग बनले, व एकूण क्षमता संकुचन वेग द्वारे प्रमाणीत केले गेले (एन्क्रिप्शनचे वेग नाही). संकुचन अकार्यान्वीत केल्यास, एकूण कार्यक्षमता खूपच जास्त आहे. या अद्ययावत संकुल अंतर्गत, zlib संकुचन SSL व TLS जुळवणी करीता OPENSSL_NO_DEFAULT_ZLIB वातावरण वेरीयेबलसह अकार्यान्वीत केले जातील. हळुवार संजाळ वरील TLS जुळवणी करीता, संकुचन वगळण्यास सूचविले जाते, ज्यामुळे स्थानांतरनजोगी माहितीचे प्रमाण कमी होते.

  • openssl आदेशला s_clients_server पर्याय सह वापरत असल्यास, मुलभूत CA प्रमाणपत्र फाइलचे (/etc/pki/tls/certs/ca-bundle.crt) वाचन केले गेले नाही. यामुळे प्रमाणपत्र तपास अपयशी ठरले. प्रमाणपत्रांना तपासणी पूर्ण करण्याकरीता, -CAfile /etc/pki/tls/certs/ca-bundle.crt पर्यायचा वापर केला पाहिजे. या अद्ययावतीत संकुल अंतर्गत, मुलभूत CA प्रमाणपत्र फाइलचे वाचन केले जाते, व यापुढे -CAfile पर्याय निश्चित करण्याची आवश्यकता नाही.

yum Re-Base

yum यांस अपस्ट्रीम आवृत्ती 3.2.18 यानुरूप आधारीत केले गेले आहे. हे अद्ययावत yum ज्या गतीने कार्य करतो त्यात सुधार करतो, ज्यामुळे प्रत्येक प्रकाशनवेळी समाविष्ट होणाऱ्या संकुलच्या वाढत्या प्रमाणमुळे निर्माण होणारी अडचण दर्शविले जाते. याच्या व्यतिरीक्त, हे अद्ययावत reinstall आदेश पुरविते, अनेक आदेश करीता संवाद सुधारीत केले आहे, व बरेच त्रुटी निर्धारण समाविष्ट केले गेले आहे, प्रमुख्याने:

  • संकेत स्थळ (http) वरील संयोजना फाइल करीता -c पर्याय वापरल्यास कुठलेही yum आदेश अपयशी ठरेल. या बगचे आता निर्धारण झाले आहे.

  • yum अंतर्गत checkSignal() कार्यपद्धतीने अयोग्य exit कार्यपद्धतीला कॉल केले आहे; तरी, yum पासून बाहेर पडल्यास traceback ला कारणीभूत ठरेल. या प्रकाशनसह, yum आता योग्यरित्या बाहेर पडतो.

flash-plugin Re-Base

flash-plugin संकुल आवृत्ती 10.0.12.36 यानुरूप आधारीत केले गेले आहे. या अद्ययावतात अनेक सुरक्षा निर्धारण जे पूर्वीच्या flash-plugin ASYNC अद्ययावत अंतर्गत समाविष्ट केले. पुढे, या अद्ययावत प्लगइन अंतर्गत Adobe Flash Player 10 देखील समाविष्टीत आहे, ज्यात खालिल बग निर्धारण व गुणविशेष सुधारणांचे समावेशन आहे:

  • साऊन्ड आऊटपुट अंतर्गत रेस स्थितीचे निर्धारण केल्यामुळे Linux प्लॅटफॉर्म वरील स्थिरता सुधारीत केली.

  • इच्छिक फिल्टर व प्रभाव, मुळ 3D स्थानांतरन व एनिमेशन, प्रगत ऑडिओ विश्लेषण करीता नविन समर्थन, एक नविन, जास्त लवचीक पाठ्य इंजीन, व GPU हार्डवेअर गतिकता.

या अद्ययावत विषयी अधिक माहिती करीता, Adobe Flash Player 10 याचे प्रकाशन टिप खालिल लिंकवर पहा:

http://www.adobe.com/support/documentation/en/flashplayer/10/Flash_Player_10_Release_Notes.pdf

gdb Rebase

gdb आता आवृत्ती 6.8 यानुरूप आधारीत आहे. यात अनेक अपस्ट्रीम गुणविशेष अद्ययावत व बग निर्धारण समाविष्टीत आहे, प्रमुख्याने: C++ टेम्पलेट, कनस्ट्रकटर व इनलाइन कार्यपद्धती अंतर्गत ब्रेकपॉइन्ट करीता समर्थन समाविष्टीत आहे.

या प्रकाशन अंतर्गत gdb अद्ययावत विषयी अधिक माहिती करीता, http://sourceware.org/cgi-bin/cvsweb.cgi/src/gdb/NEWS?rev=1.259.2.1&cvsroot=src पहा.

AMD Family10h प्रोसेसरवर आधारीत सूचना आधारीत सॅमप्लींग

Red Hat Enterprise Linux 5.3 करीता AMD Family10h प्रोसेसर साठी नविन हार्डवेअर प्रोफाइलींग समर्थन जोडले गेले आहे. या नविन AMD CPUs Instruction Based Sampling (IBS) करीता समर्थन पुरवितो. IBS समर्थन करीता oProfile ड्राइवर करीताचे बदलावांनी ही माहिती प्राप्त केली पाहिजे व नविन Model Specific Registers (MSRs) प्रारंभ करणे आवश्यक आहे.

हे अद्ययावत नविन IBS_FETCHIBS_OP प्रोफाइलींग सॅम्पल दर CPU बफर व oProfile ड्राइवरच्या घटना बफर करीता जोडते. IBS सॅम्पलींग नियंत्रीत करण्याकरीता /dev/oprofile करीता नविन कंट्रोल नोंदणी देखिल जोडले गेले आहेत. हे बदलाव ड्राइवरच्या पूर्वीचे PMC आवृत्तीशी बॅकवर्ड सहत्व आहे, व नविन माहिती वापरण्याकरीता oProfile 0.9.3 चे वेगळे पॅच उपलब्ध आहे.

IBS विषयी अधिक माहिती करीता खालिल पेपर पहा: सूचना-आधारीत सम्पलींग: AMD फॅमिली 10h प्रोसेसर, नोव्हेम्बर 19, 2007 करीता एक नविन कार्यक्षमता विश्लेषण पद्धती

Squid Re-base

Squid अलिकडील स्थीर अपस्ट्रीम आवृत्ती (STABLE21) नुरूप आधारीत केले गेले आहे. या अद्ययावतात अनेक बग This update addresses several bugs, including:

  • squid init स्क्रिप्ट नेहमी अयोग्यरित्या exit code ची संख्या 0 दर्शवितो. या बगचे आता निर्धारण केले गेले आहे, ज्यामुळे squid Linux Standard Base शी सहत्व करण्यास मदत होते.

  • refresh_stale_hit डिरेक्टीव्हचा वापर केल्यास त्रुटी संदेश घड्याळ पाठीमागे जात आहे निर्माण होते व ते squid लॉग फाइल अंतर्गत दर्शविले जाते.

  • squid प्रतिष्ठापन कार्यपद्धती /usr/local/squid संचयीकाचे योग्य मालकी हक्क स्थापीत केले नाही. या प्रकाशनमुळे, वापरकर्ता squid आता /usr/local/squid चा मुलभूत मालक आहे.

  • जेव्हा squid कार्यपद्धती hash_lookup() वापरण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा signal 6 सह खंडीत होऊ शकतो.

  • squid_unix_group चा वापर केल्यामुळे squid क्रॅश होऊ शकतो.

Apache अंतर्गत घटना बहु-विश्लेषण प्रारूप

httpd, Apache HTTP Server संकुल, आता प्रयोगीक event Multi-Processing Model (MPM) चे समावेषन करतो. keepalive जुळवणी हाताळणी करीता लक्षवेधी थ्रेडचा वापर करून MPM कार्यक्षमता सुधारीत करतो.

audit अद्ययावत

audit संकुल मध्ये वापरकर्ता-क्षेत्र अनुप्रयोग समाविष्टीत आहे ज्याचा वापर कर्नल अंतर्गत ऑडीट उपप्रणाली द्वारे निर्मीत ऑडीट रेकॉर्ड संचयन व शोध करीता केला जातो. audit संकुल नविन अपस्ट्रीम आवृत्ती 1.7.7 नुरूप सुधारीत केले गेले आहे, जे पूर्वीच्या ऑडीट संकुलच्या तुलनेत सुधारणा व बग निर्धारण दोन्ही पुरविते.

हे अद्ययावतीत ऑडीट संकुल खालिल सुधारणा जोडतात:

  • ऑडीट प्रणाली आता दूरस्थ दाखलन कार्यान्वीत करू शकते.

  • auditctl उपकार्यक्रम आता ऑडीट नियम अंतर्गत फक्त बहु कि करीता समर्थन पुरविते.

  • चाचणी STIG नियम फाइल (stig.rules) ज्यात auditctl नियमचे समावेषन आहे जे ऑडीट डीमन init स्क्रीप्ट द्वारे प्रारंभ केले जाते तेव्हा दाखल केले जाते आता या अद्ययावतीत संकुल अंतर्गत उदाहरण म्हणून पुरविले जाते.

  • एक नविन उपकार्यक्रम, ausyscall, syscall नाव व क्रमांक माहिती परस्पररित्या सहभागीय करण्याकरीता जोडले गेले आहे.

  • aureport आता ऑडीट घटना अंतर्गत प्रदर्शीत कि विषयी अहवाल पुरविते.

  • ausearch व aureport कार्यक्रम करीता घटना लॉग वाचन सुधारीत करण्यात आले आहे.

libgomp re-base

libgomp यांस आवृत्ती 4.3.2-7.el5 करीता री-बेस केले गेले आहे. री-बेस OpenMP कार्यक्षमता सुधारीत करतो व gcc43 कंपाइलर सह वापरल्यास OpenMP आवृत्ती 3.0 करीता समर्थन जोडतो.

iSCSI लक्ष्य क्षमता

iSCSI लक्ष्य सहत्वता, Linux Target (tgt) मांडणी अंतर्गत वाटप केलेले, Red Hat Enterprise Linux 5.3 मध्ये तंत्रज्ञाण पूर्वपदृश्य पासून पूर्णतया समर्थन यानुरूप सुधारीत करण्यात आले आहे. linux target मांडणी प्रणालीला SCSI प्रारंभक सह सक्षम इतर प्रणाली करीता ब्लॉक-स्तरीय SCSI संचयन पुरविण्यास परवानगी देते. ही सहत्वता प्रारंभ स्वरूपी Linux iSCSI लक्ष्य म्हणून लागू केले जाते, संजाळवरील कुठल्याही iSCSI प्रारंभकर्ता करीता संचयन पुरविते.

iSCSI लक्ष्य संयोजीत करण्याकरीता, scsi-target-utils RPM प्रतिष्ठापीत करा व सूचना पहाण्याकरीता येथे जा: /usr/share/doc/scsi-target-utils-[version]/README/usr/share/doc/scsi-target-utils-[version]/README.iscsi

3. ड्राइवर अद्ययावत

3.1. सर्व मांडणी

साधारण ड्राइवर/प्लॅटफॉर्म अद्ययावत
  • ALSA अंतर्गत Intel High Definition ऑडिओ ड्राइवर अद्ययावतीत केले गेले आहे.

  • AMD ATI इन्टीग्रेटेड चिपसेट वरील High-Definition Multimedia Interface (HDMI) ऑडिओ समर्थन अद्ययावतीत केले गेले आहे.

  • खालिल Wacom चित्रलेखीय टॅबलेट आता linuxwacom ड्राइवर द्वारे समर्थीत आहे:

    • Cintiq 20WSX

    • Intuos3 4x6

  • lpfc ड्राइवर Emulex Fibre Channel Host Bus Adapters करीता आवृत्ती 8.2.0.33.2p यानुरूप अद्ययावतीत केले गेले आहे. यात अनेक अपस्ट्रीम बदलावांचे समावेशन केले आहे, मुख्यतया:

    • NETLINK_SCSITRANSPORT सॉकेट आता वापरले जाते

    • विनाप्रारंभ नोड प्रवेशचे निर्धारण केले.

    • NPIV कार्यान्वीत केल्यावर echotest अपयश करीता कारणीभूत ठरणारे बगचे निर्धारण केले.

    • fcauthd 1.19 आता फायबर मार्ग अधिप्रमाणता करीता आवश्यक आहे.

  • dm-multipath ला आता IBM DS4000 करीता इन्बॉक्स समर्थन पुरविले जाते.

  • ixgbe ड्राइवर आता 82598AT डुअल-पोर्ट अडॅप्टर व 82598 CX4 अडॅप्टर करीता समर्थन पुरविते.

  • jsm ड्राइवर याचे Digi Neo PCI Express 4 HiProfile I/O अडॅप्टर करीता समर्थन जोडण्याकरीता अद्ययावत केले गेले आहे.

  • hp-ilo: ड्राइवर जोडले, ज्यामुळे HP Integrated Lights Out (iLO) तंत्रज्ञाण यांस समर्थन पुरविले जाते.

  • radoen_tp ड्राइवर या प्रकाशन करीता आता पूर्णतया समर्थीत आहे. हे ड्राइवर ATI R500/R600 चीपसेट कार्यान्वीत करते.

    ड्राइवर खालिल गुणविशेष देखिल दर्शवितो:

    • R500/R600 चीपसेट वरील पध्दती संयोजन

    • R500 चीपसेट वरील 2D प्रवेगन

    • R600 चीपसेट वरील शॅडो फ्रेमबफर प्रवेगन

  • powernow-k8 ड्राइवर आता या प्रकाशात दाखलनजोगी विभाग नुरूप समाविष्ट केले गेले आहे. याचे अर्थ असा की वर्तमान ड्राइवर मांडणी (जसे की Red Hat Driver Update ModelDell DKMS) वापरकर्त्यास powernow-k8 ड्राइवर अद्ययावत, कर्नल करीता संकुल सुधारणा विना RPM संकुल पुरवू शकते.

  • या प्रकाशन मध्ये, लेगसी छपाईयंत्र करीता समर्थन पुरविण्यासाठी Red Hat pnm2ppa पुन्हा जोडले. लक्षात ठेवा, या समर्थनचा वापर कमी असल्यामुळे पुढिल मुख्य आवृत्ती पासून वगळण्यात येईल.

  • ccid ड्राइवरची USB Smartcard कळफलक करीता पुन्ह मांडणी करण्यात आली आहे.

  • uvcvideo ड्राइवर USB विडीओ साधन करीता Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत कर्नल मध्ये समाविष्ट केले गेले आहे.

नेटवर्क
  • bnx2 ड्राइवर Broadcom NetXtreme II संजाळ कार्ड करीता आवृत्ती 1.7.9 यानुरूप अद्ययावतीत केले गेले आहे. हे अद्ययावत कंट्रोलर जे bnx2 चा वापर बूटवेळी प्रणालीस पॅनीक निर्माण करणाऱ्या बगचे निर्धारण करीता व इथरनेट बफर पर्याय अद्ययावतीत करण्याकरीता केला जातो.

  • e1000e ड्राइवर, Intel PRO/1000 इथरनेट साधन यांस अपस्ट्रीम आवृत्ती 0.3.3.3-k2 यानुरूप अद्ययावतीत केले गेले आहे. या अद्ययावतमुळे, समर्थीत साधनाचे EEPROM व NVM आता लेखनजोगी झाले आहेत.

  • igb: Intel Gigabit Ethernet Adapters करीता ड्राइवर आवृत्ती 1.2.45-k2 यानुरूप अद्ययावतीत केले गेले आहे, तसेच 82576 आधारीत साधन करीता समर्थन पुरविते.

  • ixgbe ड्राइवर Intel(R) 10 Gigabit PCI Express संजाळ साधन करीता आवृत्ती 1.3.18-k4 यानुरूप अद्ययावत केले गेले आहे.

  • niu ड्राइवर Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत जोडले गेले आहे, ज्यामुळे Sun CP3220 प्रणाली वरील 10Gbps इथरनेट साधन करीता समर्थन पुरविले जाते.

  • ipw2100ipw2200 ड्राइवर, Intel PRO Wireless साधन करीता, यांस Linux Kernel 2.6.25 पासून Red Hat Enterprise Linux 5.3 करीता बॅकपोर्ट केले गेले आहे.

  • bcm43xx ड्राइवर Broadcom Wireless साधन करीताRed Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत Linux Kernel 2.6.25 पासून बॅकपोर्ट केले गेले आहे.

  • ieee80211 समर्थन घटक वायरलेस साधन करीता Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत Linux Kernel 2.6.25 पासून बॅकपोर्ट केले गेले आहे.

  • zd1211rw ड्राइवर ZyDas Wireless साधन यास Linux 2.6.25 पासून अखेरच्या non-mac80211 आवृत्तीशी जुळवणी करीता अद्ययावतीत केले गेले आहे.

  • iwlwifi ड्राइवर यास आवृत्ती 2.6.26 पासून सुधारीत केले गेले आहे, तसेच 802.11n iwl4965 वायरलेस साधन करीता समर्थन पुरविते. बॅकपोर्ट केलेले ड्राइवर अंतर्गत 2.6.26 पासून पुढिल आवृत्तीतील बरेचशे बग निर्धाण समाविष्ट केले गेले आहे.

  • myri10ge ड्राइवरचे Myricom Myri-10G Ethernet साधन करीता आवृत्ती 1.3.2-1.269 या नुरूप अद्यायवतन केले गेले आहे.

  • NetXen संजाळ कार्ड करीता netxen ड्राइवर आवृत्ती 3.4.18 करीता अद्ययावतीत केले गेले आहे.

  • bnx2x ड्राइवर Broadcom Everest संजाळ साधन करीता आवृत्ती 1.45.23 यानुरूप अद्ययावतीत केले गेले आहे, तसेच 57711 हार्डवेअर करीता समर्थन पुरविते.

  • योग्य लिंक ओळखण्याकरीता बगच्या निर्धारण साठी forcedeth-msi ड्राइवरचे अद्ययावतन करण्यात आले आले.

  • ath5k ड्राइवर Atheros वायरलेस साधन करीता Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत Linux Kernel 2.6.26 पासून बॅकपोर्ट केले गेले आहे.

  • rt2x00 ड्राइवर Ralink वायरलेस साधन करीता Linux Kernel 2.6.26 पासून Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत बॅकपोर्ट केले गेले आहे.

  • rtl8180rtl8187 ड्राइवर Realtek वायरलेस साधन करीता Linux Kernel 2.6.25 पासून Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत बॅकपोर्ट केले गेले आहे.

  • cxgb3: ड्राइवर आता (along with corresponding firmware) या प्रकाशन अंतर्गत समाविष्ट केले गेले आहे. हे ड्राइवर आता Chelsio RDMA 10Gb PCI-E Ethernet adapter ला समर्थन पुरविते.

संचयन
  • 3w-xxxx: 3ware SATA RAID Controllers करीता ड्राइवरचे आवृत्ती 1.26.03 यानुरूप अद्ययावत केले गेले आहे. यात अनेक अपस्ट्रीम बदलाव समाविष्टीत केले गेले आहे, मुख्यतया:

    • 2GB पेक्षा जास्त RAM असणाऱ्या प्रणालीवर 3ware 7000 किंवा 8000 सिरीज कार्डचा वापर करतेवेळी माहिती सदोषीत करणारे बगचे निर्धारण केले.

    • 4GB पेक्षा जास्त RAM असणाऱ्या प्रणालीवर 3ware 8006 सिरीज कार्डचा वापर करतेवेळी 64-bit मांडणी वर Anaconda या पुढे स्तब्ध होत नाही.

    • __tw_shutdown() प्रारंभ केल्यावर irq हन्डलर आता मोकळे केले जाते. यामुळे शटडाऊनवेळी इन्टरप्ट सहभागीय केले असल्यास संभाव्य null pointer de-reference टाळले जाते.

    • पद्धती पान कॅश करण्याकरीता RCD बीट आता कार्यान्वीत केले गेले आहे.

    • ioctl resets व scsi resets आता सिरीयलाइज केले गेले आहे ज्यामुळे मतभेद वगळले जाईल.

  • 3w-9xxx: 3ware SATA RAID कंट्रोलर करीता आवृत्ती 2.26.08 यानुरूप अद्ययावत केले गेले आहे. यात बरेच अपस्ट्रीम बदलाव समाविष्टीत आहे, मुख्यतया:

    • pci_unmap_single() कॉल आता 4GB पेक्षा जास्त RAM करीता योग्यरित्या कार्य करते

    • लेखन कार्यक्षमता हळु करणारे बगचे आता निर्धारण केले गेले आहे.

    • 64-बीट अपयशी झाल्यास DMA मास्क संयोजना आता 32-बीटचा वापर करते.

    • 3ware 9690SA SAS कंट्रोलर साधन करीता समर्थन जोडले.

  • megaraid_sas: ड्राइवर आवृत्ती 4.01-rh1 करीता अद्ययावत केले. बरेच बग निर्धारण या अद्ययावताचा वापर करते, ज्यात खालिल समाविष्टीत आहे:

    • MFI_POLL_TIMEOUT_SECS आता 60 सेकंद आहे.

    • फ्रेम प्रमाण गणना करतेवेळी सतत चीप रिसेट व कमांड टाइमआऊट निर्माण करणाऱ्या बगचे निर्धारण केले.

    • LSI Generation 2 Controllers (0078, 0079) करीता समर्थन जोडले.

    • फर्मवेअर शटडाऊन सुधारीत करण्याकरीता व DCMD बंद करण्याकरीता शटडाऊन कार्यपद्धतीत आदेश जोडले.

    • हार्डवेअर Linux ड्राइवर अंतर्गत अनपेक्षीत व्यत्यय निर्माण करणारे बगचे निर्धारण केले.

  • SCSI device handler मांडणी (scsi_dh) अद्ययावतीत केले गेले आहे, तसेच खालिल सुधारणा देखिल पुरविली जाते:

    • मुलभूत ALUA (asymmetric logical unit access) हॅन्डलर लागू करण्यात आले आहे.

    • LSI RDAC SCSI आधारीत संचयन साधन करीता समर्थन जोडले.

  • qla2xxx ड्राइवर QLogic Fibre Channel Host Bus Adapters करीता अद्ययावतीत केले गेले आहे, ज्यामुळे ISP84XX प्रकारचे कार्ड करीता समर्थन पुरविले जाते.

  • virtual SCSI (vSCSI) साधन एम्यूलेट करण्याकरीता ibmvscsi ड्राइवर अद्ययावत करण्यात आले, ज्यामुळे आभासी टेप साधन करीता समर्थन पुरविले जाते.

  • lpfc: ड्राइवर आवृत्ती 8.2.0.30 करीता अद्ययावत केले गेले आहे. या अद्ययावतात बरेच बग बदलाव व सुधारणा समाविष्टीत आहेत, खालिलचे देखिल समावेषन करण्यात आले आहे:

    • PowerPC मांडणी वरील PCI अडॅप्टर करीता सुधारीत Enhanced Error Handling (EEH)

    • समर्थीत NPIV आभासी पोर्टची संख्या वाढविले

    • I/O queue depth च्या नियंत्रण करीता ड्राइवरचे लॉजिक वाढविले

    • Fibre Channel over Ethernet (FCoE) अडॅप्टर करीता समर्थन वाढविले

    • नविन हार्डवेअर करीता SAN पासून बूट करण्यासाठी आता समर्थन पुरविले गेले आहे

  • cciss ड्राइवर HP Smart Array कंट्रोलर करीता आवृत्ती 3.6.20-RH2 यानुरूप आधारीत केले गेले आहे.

4.1. सर्व मांडणी

  • relayfs चे पूर्वीचे बफर आकार मर्यादा 64MB एवढे होते. या अद्ययावत मध्ये, relayfs ऑन-मेमरी बफर करीता स्मृती मर्यादा 4095MB अशी वाढविली गेली आहे. यामुळे SystemTap व इतर ट्रेसींग साधन जे relayfs चा वापर करतात, अधिक घटना शोधण्यास पात्र ठरतात.

  • Dell Remote Access Controller 4 (DRAC4) करीता ड्राइवर प्रस्तुत केले गेले नाही. यामुळे, DRAC4 द्वारे पुरविले गेलेले कुठलेही आभासी साधन कर्नल द्वारे ओळखले जाऊ शकले नाही. या अद्ययावत अंतर्गत, pata_sil680 कर्नल विभाग जे योग्य ड्राइवर पुरविते जोडले गेले आहे, जे या अडचणीचे निर्धारण करते.

  • relay_open() ला कॉल केल्यावर, संदेश बफर relay संवाद फक्त ऑनलाइन CPUs करीताच लागू केले गेले होते. यामुळे, relay_open() कॉल केल्यावर ऑफलाइन CPU सुरू केल्यास, कर्नल पॅनीक निर्माण होऊ शकतो. या अद्ययावतात, नविन CPUs जोडल्यास नविन संदेश बफरचे गतिकरित्या वाटप केले जाते.

  • DSR/DTR हार्डवेअर प्रवाह नियंत्रण करीता समर्थन पुरविण्यासाठी 8250 आधारीत सिरीयल पोर्ट करीताचे ड्राइवर अद्ययावतीत केला गेले आहे .

  • Dell Wireless Wide Area Network (WWAN) कार्ड करीताचे समर्थन कर्नल अंतर्गत जोडले गेले आहे. समर्थीत साधन खालिल नुरूप आहे:

    • Dell Wireless 5700 Mobile Broadband CDMA/EVDO Mini-Card

    • Dell Wireless 5500 Mobile Broadband HSDPA Mini-Card

    • Dell Wireless 5505 Mobile Broadband HSDPA Mini-Card

    • Dell Wireless 5700 Mobile Broadband CDMA/EVDO ExpressCard

    • Dell Wireless 5510 Mobile Broadband HSDPA ExpressCard

    • Dell Wireless 5700 Mobile Broadband CDMA/EVDO Mini-Card

    • Dell Wireless 5700 Mobile Broadband CDMA/EVDO Mini-Card

    • Dell Wireless 5720

    • Dell Wireless HSDPA 5520

    • Dell Wireless HSDPA 5520

    • Dell Wireless 5520 Voda I Mobile Broadband (3G HSDPA) Mini-Card

  • नविन Thinkpad मॉडल करीता समर्थन पुरविण्यासाठी thinkpad_acpi कर्नल विभाग अद्ययावत केले गेले आहे.

  • सॉफ्ट लॉकअप डिटेक्टर आता सावधानता संदेश ऐवजी कर्नल पॅनीक निर्माण करण्याकरीता संयोजीत केले जाऊ शकते. यामुळे सॉफ्ट लॉकअपवेळी वापरकर्ता विश्लेषण कारणास्तव क्रॅश डंपचे निर्माण व विश्लेषण करू शकतो.

    सॉफ्ट लॉकअप ओळखकर्त्याला पॅनीक निर्माण करण्यासाठी संयोजीत करायचे असल्यास, कर्नल घटक soft_lockup यास 1 असे निश्चित करा. हे घटक मुलभूतरित्या 0 करीता निश्चित केले जाते.

  • oprofile ने योग्यरित्या Next-Generation Intel Microarchitecture (Nehalem) आधारीत प्रोसेसर ओळखले नाही. यामुळे, कार्यक्षमता नियंत्रण यूनीटचे उपयोग केले जाऊ शकत नाही व प्रोसेसरला टाइमर व्यत्य करीता समारे जावे लागले. या अडचणचे निर्धारण करीता कर्नल अद्ययावतीत केले गेले आहे.

  • Next-Generation Intel Microarchitecture (Nehalem) वरील CPU पॉवर स्तर, C3, करीता कर्नल अंतर्गत समर्थन पुरविले गेले आहे. C3 (त्यास sleep state असे ही म्हटले जाते) प्रविष्ट करण्याची क्षमता रिकामे असल्यावर CPU चे पॉवर कार्यक्षमता सुधारीत करतो.

  • पूर्वी, कर्नल अंतर्गत MAX_ARG_PAGES मर्यादा फार कमी निश्चित केली जात असे, व खालिल त्रुटी करीता कारणीभूत ठरत असे:

    execve: Argument list too long
    या अद्ययावतात, ही मर्यादा स्टॅक आकारातील 25 टक्के जास्त वाढविली गेली आहे, ज्यामुळे या त्रुटीचे निर्धारण झाले आहे.

  • autofs4 अद्ययावत linux कर्नल आवृत्ती 2.6.27 पासून Red Hat Enterprise Linux 5.3 करीता बॅकपोर्ट केले गेले आहे.

  • Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत मुळ फाइलला प्रत्यक्ष फाइलशी न करता, वापरकर्ता क्षेत्र अनुप्रयोगातील फोर्कड् प्रतशी पाइप करण्याची क्षमता समाविष्ट केली गेली आहे. हे सहसा | path/to/application यास /proc/sys/kernel/core_pattern अंतर्गत स्थीत करून कार्यान्वीत केले जाते. कोर डंप केल्यावर, निर्देशीत अनुप्रयोगचे प्रत कार्यान्वीत केले जात, व कोर त्याकरीता stdin वर पाइप केले जाईल. यामुळे कोर डंप वेळेस कोर वाढवू, विश्लेषीत व सक्रीयरित्या हाताळले जाऊ शकते.

  • फाइल /proc/cpuinfo आता Advanced Programmable Interrupt Controller (APIC) चे ID कळविते ज्याचा वापर प्रत्येक CPU द्वारे केले जाते.

  • Machine Check Exception (MCE) कर्नल उपप्रणाली मोठी स्मृती संयोजना नविन प्रणाली द्वारे आवश्यक असल्यानुरूप सुधारीत करण्यात आले आहे.

  • mount आदेश आता फक्त Samba द्वारे आरोहीत फाइलप्रणाली करतीच Kerberos अधिप्रमाणता समर्थन पुरविते. sec=krb5 किंवा sec=krb5i switch कर्नलला वापरकर्ता अनुप्रयोग करीता कॉल करण्यास परवानगी देते (cifs.upcall) जे SPNEGO (Simple and Protected GSSAPI Negotiation Mechanism) सुरक्षा blob (Binary Large OBject) रीटर्न करते. कर्नल त्यानंतर या blob चा वापर सर्वरशी अधिप्रमाणता व विनंतीकृत फाइलप्रणाली आरोहीत करण्याकरीता करतो.

  • कर्नल घटक kernel.unknown_nmi_panic यास IOAPIC NMI watchdog कार्यपद्धतीचा वापर करणाऱ्या प्रणालीवर संयोजीत केल्यास, kernel panic आढळू शकतो. हे NMI watchdog NMIs चे स्त्रोत सुरक्षितरीत्या अकार्यान्वीत न केल्यामुळे होते.

    या प्रकाशनमुळे, NMI watchdog कोडचे पुन्हलेखन वापरकर्त्याला सुरक्षिरीत्या NMI स्त्रोत अकार्यान्वीत करण्याकरीता केले गेले आहे. तरी, तुम्ही आता सुरक्षितरीत्या IOAPIC NMI watchdog कार्यपद्धतीचा वापर करणाऱ्या प्रणाली करीता कर्नल घटक kernel.unknown_nmi_panic संयोजीत करू शकता.

4.2. x86 मांडणी

  • powernowk8 ड्राइवर कार्यरत CPUs च्या संख्या करीता आवश्यक तपासणी करत नसे. यामुळे, ड्राइवरला सुरू केल्यावर, कर्नल oops त्रुटी संदेश दर्शविले जात असे. या अद्ययावत अंतर्गत powernowk8 ड्राइवर समर्थीत CPUs (supported_cpus) संख्याची तपासणी करतो व ऑनलाइन CPUs (num_online_cpus) शी संलग्न आहे याचीही खात्री करतो, ज्यामुळे या अडचणीचे निर्धारण होते.

4.3. PowerPC मांडणी

  • CPUFreq, कर्नल उपप्रणाली जे CPU फ्रिक्वेंसी व वोल्टेजचे प्रमाण पहाते, त्यास Cell प्रोसेसर करीता सुधारीत समर्थनसह अद्ययावतीत केले गेले आहे. हे अद्ययावत Synergistic Processing Unit (SPU) aware CPUFreq governor चा वापर करते जे Cell प्रोसेसर करीता पॉवर व्यवस्थापन सुधारीत करण्यास मदत करते.

  • Error Detection and Correction (EDAC) आता Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत Cell Broadband Engine Architecture वर समर्थीत आहेत. EDAC कार्यान्वीत करण्याकरीता, आदेश: modprobe cell_edac चा वापर करे

    याची तपासणी करण्याकरीता कार्यरत कर्नल अंतर्गत विभाग जोडले गेले आहे, खालिल नुरूप आऊटपुट करीता /var/log/dmesg तपासा:

    EDAC MC: Ver: 2.0.1 Oct  4 2008
    EDAC MC0: Giving out device to cell_edac MIC: DEV cbe-mic
    EDAC MC1: Giving out device to cell_edac MIC: DEV cbe-mic

    योग्य स्मृती त्रुटी आढळल्यास, खालिल संदेश कन्सोल करीता पाठविले जाईल:

    EDAC MC0: CE page 0xeff, offset 0x5700, grain 0, syndrome 0x51, row 0, channel
    0, label "":
  • हार्डवेअर watchpoints सह मल्टि थ्रेड अंतर्गत सहभागीय वेरीयेबलचा वापर करून डीबगींगमुळे GNU Debugger (GDB) घटना प्रारंभची वेळ विसरत असे. कर्नल GDB द्वारे नेहमी watchpoint triggers प्राप्त करण्याकरीता संयोजीत केले गेले आहे, ज्यामुळे डीबगींग सत्राची विश्वसार्हता सुधारली जाते.

4.4. x86_64 मांडणी

  • kprobe-booster आता ia64 व x86_64 मांडणी वर समर्थीत आहे, यामुळे वापरकर्ता कर्नल घटक शोधू शकेल. या गुणविशेषमुळे 64-बीट मांडणीचे सर्वर वरील कार्यरत शोध साधनामुळे (उ.दा.SystemTap व Kprobes) निर्माण होणारे ओव्हरहेड देखील कमी होते.

  • _PTC (Processor Throttling Control), _TSS (Throttling Supported States) व _TPC (Throttling Present Capabilities) ऑबजेक्ट करीता कर्नल अंतर्गत समर्थन जोडले गेले आहे. हे समर्थन, जे Configuration and Power Interface संयोजना (ACPI) चे भाग आहे प्रोसेसर थ्रॉटलीगं करीता सुधारीत व्यवस्थापन पुरविते.

4.5. s390x मांडणी

  • zipl.conf मध्ये, single quotes अंतर्भूतीत double quotes मधिल घटक (म्हणजेच parameters='vmhalt="LOGOFF"') अयोग्यरित्या वाचले गेले.यामुळे, kernel-kdump संकुल प्रतिष्ठापन अपयशी ठरले, व खालिल त्रुटी करीता कारणीभूत ठरते:

    grubby fatal error: unable to find a suitable template
    या अडचणचे निर्धारण करीता, घटक double quotes च्या आत single quotes यानुरूप अंतर्भूतीत असायला हवे (उदा parameters="vmhalt='LOGOFF'")

    Note

    double quotes अंतर्गत single quotes ची मांडणी स्वरूपन हे Red Hat Enterprise Linux 5 अंतर्गत मुलभूत मांडणी आहे.

4.6. ia64 मांडणी

  • Dual-Core Intel Itanium 2 प्रोसेसर पूर्वीच्या Intel Itanium प्रोसेसरच्या तुलनेत machine check architecture (MCA) रेकॉर्ड वेगळेरित्या भरतो. cache check व bus check target identifiers ठराविक परिस्थिती अंतर्गत वेगळे असू शकते. योग्य target identifier ओळखण्याकरीता कर्नलला अद्ययावत केले गेले आहे.

  • kprobe-booster आता ia64 व x86_64 मांडणी वर समर्थीत आहे, यामुळे वापरकर्ता कर्नल घटक शोधू शकेल. या गुणविशेषमुळे 64-बीट मांडणीचे सर्वर वरील कार्यरत शोध साधनामुळे (उ.दा.SystemTap व Kprobes) निर्माण होणारे ओव्हरहेड देखील कमी होते.

  • या अद्ययावतात, कर्नल अंतर्गत pselect()ppoll() प्रणाली कॉल करीता समर्थन जाडले गेले आहे.

5. आभासीकरण

या विभागात Red Hat Enterprise Linux च्या आभासीकरण साधन करीता केले गेलेले अद्ययावत विषयी माहिती समाविष्टीत आहे.

5.1. गुणविशेष अद्ययावत

  • blktap (blocktap) वापरकर्ता साधनपेटी अद्ययावत केले गेले आहे, ज्यामुळे blktap प्रतिकृतीत आभासी अतिथीची स्थानांतरन आकडेवारी नियंत्रीत ठेवण्यास मदत प्राप्त होते.

  • Intel Extended Page Table (EPT) गुणविशेष करीता समर्थन जोडले गेले, ज्यामुळे EPT ला समर्थन पुरविणाऱ्या हार्डवेअर करीता पूर्णतया आभासी अतिथीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळते.

  • या अद्ययावतात अतिथी करीता e1000 संजाळ साधन एम्यूलेशन जोडले गेले आहे, व फक्त Windows 2003 अतिथी guests on the ia64 architecture. To use e1000 emulation, the xm command must be used.

  • virtio करीता ड्राइवर, जे KVM अंतर्गत I/O आभासीकरण करीता प्लॅटफार्म आहे, Linux Kernel 2.6.27 पासून Red Hat Enterprise Linux 5.3 करीता बॅकपोर्ट केले गेले आहे. हे ड्राइवर KVM अतिथीला I/O कार्यक्षमतेतील उच्च स्तर प्राप्त करण्यास कार्यान्वीत करते. virtio साधन करीता समर्थन पुरविण्याकरीता अनेक वापरकर्ता घटक जसे की: anaconda, kudzu, lvm, selinuxmkinitrd यांस अद्ययावतीत केले गेले आहे.

  • मुळ Linux कर्नल आपोआप vmcoreinfo करीता समर्थन पुरवितो, परंतु, dom0 क्षेत्रावर kdump संयोजीत करण्याकरीता, kernel-xen-debuginfo संकुलची आवश्यकता होती. या प्रकाशन द्वारे, कर्नल व हायपरवाइजरचे संपादन केले गेले आहे व आता vmcoreinfo वाचन व kdump मुळस्वरूपी लिहीण्यासही समर्थन पुरविते. ज्या वापरकर्त्यांना kdump चा वापर डीबगींग किंवा इतर dom0 क्षेत्र वरील तपासणी करीता करायचे असल्यास विना debuginfo किंवा debuginfo-common संकुल प्रतिष्ठापन करू शकतात.

  • एम्युलेटेड डिस्क व संजाळ साधन वापरतेवेळी पूर्णतया आभासी Red Hat Enterprise Linux 5 अतिथीस कार्यक्षमतेत वाढ आढळून आले. या अद्ययावत अंतर्गत, पूर्णतया आभासी अतिथी करीता पॅरावर्च्युअलाइजड् डिस्क व संजाळ यांचा वापर सोपे करण्याकरीता kmod-xenpv संकुलचे समावेषन केले गेले आहे.

    पूर्णतया आभासी अतिथी अंतर्गत या ड्राइवरचा वापर केल्यास पूर्णतया आभासी अतिथीच्या कार्यक्षमता व कार्यपद्धतीत लक्षणीय सुधारणा आढळून येते. ओळखणी झाल्यावर netfront व block front ड्राइवरचे लगेच कर्नल संकुलसह समजुळवणी केली जाते.

  • अतिथीकडे आता 2MB बॅकींग पेज स्मृती टेबल वापरण्याची सुविधा आहे, ज्यामुळे प्रणाली कार्यक्षमता सुधारीत करण्यास मदत होऊ शकते.

5.2. निर्धारीत अडचणी

5.2.1. सर्व मांडणी

  • पॅरावर्च्युअलाइजड् अतिथीला बंद केल्यामुले dom0 ला ठराविक काळापर्यंत थांबविण्यास कारणीभूत ठरले असावे. मोठ्या प्रमाणातील स्मृती (म्हणजे 12GB व अधिक) सक्षम अतिथीवरील अनेक सेकंदाचा विलंब अनुभवला गेला. या अद्ययावत अंतर्गत, आभासी कर्नल मोठे पुरवानुमान पॅरावर्च्युअलाइजड् अतिथी बंद करण्यास परवानगी देते, जे वरील अडचणीचे निर्धारण करते.

  • vmcore फाइल पासून हायपरवाइजरचा relocation पत्ता वाचण्यास crash अपयशी ठरला. यामुळे, क्रॅश युक्त आभासी कर्नल vmcore फाइलला उघडल्यास अपयशी ठरू शकते, ज्यामुळे खालिल नुरूप त्रुटी दर्शविली जाते:

    क्रॅश: "idle_pg_table_4" चे निर्धारण शक्य नाही
    या अद्ययावतात, हायपरवाइजर आता पत्ता योग्यरित्या संचयीत करतो, ज्यामुळे वरील अडचणीचे निर्धारण शक्य झाले आहे.

  • पूर्वी, पॅरावर्च्युअलाइजड् अतिथीकडे फक्त 16 डिस्क साधन कमाल संख्या नुरूप असे. या अद्ययावतात, ही मर्यादाची संख्या कमाल संख्या म्हणजेच 256 डिस्क साधन करीता वाढविले गेले आहे.

  • kdump कर्नल करीता आरक्षीत केलेली स्मृती अयोग्य होती, ज्यामुळे क्रॅश डंप वापरण्याजोगी शक्य होते. या अद्ययावतात, स्मृती आरक्षण आता योग्य केले गेले आहे, ज्यामुळे योग्य क्रॅश डंप निर्माण होऊ शकते.

  • पॅरावर्च्युअलाइजड् अतिथी करीता ठराविक नावासह (म्हणजेच /dev/xvdaa, /dev/xvdab, /dev/xvdbc इत्यादी) डिस्क जोडल्यामुळे अतिथी अंतर्गत सदोषीत /dev साधन आढळण्यास कारणीभूत ठरते. हे अद्ययावत वरील अडचणीचे निर्धारण करते ज्यामुळे डिस्कला याला पॅरावर्च्युअलाइजड् अतिथीशी जोडल्यास अतिथी अंतर्गत /dev साधन योग्यरित्या बनविले जाते.

  • पूर्वी, loopback साधनाची संख्या 4 करीता मर्यादीत होती. यामुळे, 4 पेक्षा जास्त संजाळ संवाद असलेले प्रणालीवर ब्रीज बनविण्याची क्षमता रोखले गेली. या अद्ययावत अंतर्गत, आवश्यकता नुरूप netloop ड्राइवर आता अगाऊ loopback साधन बनवितो.

  • आभासी संजाळ बनवितेवेळी व नष्ट करतेवेळी रेस स्तिथी निर्माण होऊ शकते. काहिक घटना मध्ये -- विशेषतया अधिक लोड स्तिथीत -- आभासी साधन प्रतिसाद देणार नाही. या अद्ययावत अंतर्गत, रेस स्तिथी घडण्यापासून टाळण्याकरीता आभासी साधनचे स्तर तपासले जाते.

  • अनुप्रयोग कार्यरत असल्यास virt-manager अंतर्गत स्मृती कमतरता आढळून येते. अखेरीस, अनुप्रयोग जास्त स्मृती वापरायला लागते, ज्यामुळे स्मृती कमतरता अदभवली असावी. या अद्ययावतात, गळतीचे निर्धारण केले गेले आहे, ज्यामुळे त्रुटीचे निर्धारण शक्य होते.

  • crash उपकार्यक्रम kernel-xen कार्यरत प्रणली पासून x86_64 vmcores चे विश्लेषण करू शकले नाही कारण Red Hat Enterprise Linux हायपरवाइजर पुन्हस्थानांतरनजोगी होते व vmcore फाइलच्या ELF हेड्डर अंतर्गत पुन्हस्थानांतरनजोगी प्रत्यक्ष मुळ पत्ता पुरविले जात नाही. क्रॅश उपकार्यक्रम करीता नविन --xen_phys_start आदेश ओळ पर्याय वापरकर्त्याला पुन्हस्थानांतरनजोगी प्रत्यक्ष मुळ पत्ता पुरविण्याची परवानगी देतो.

  • Paravirtual Frame Buffer (PVFB) द्वारे सर्वच माऊन घटना प्राप्त व विश्लेषीत केले जात नाही. यामुळे, Virtual Machine Console सह पॅरावर्च्युअलाइजड् अतिथीशी संवाद साधतेवेळी सक्रोल चाक योग्यरित्या कार्य केले नाही. या सुधारणा अंतर्गत, स्क्रोल माऊस घटना आता योग्यरित्या हाताळले जातात, ज्यामुळे या अडचणीचे निर्धारण झाले आहे.

  • अधिक स्मृती (म्हणजे 256GB किंवा त्यापेक्षा जास्त) असणाऱ्या प्रणालीवर, dom0 ला संयोजीत केल्यामुळे हायपरवाइजर स्मृती हीप समाप्त होऊ शकतो. यावर उपाय म्हणून, xenheap व dom0_size आदेश ओळ बाब प्रणाली करीता वैध मुल्यसाठी निश्चित करावे लागेल. या अद्ययावत अंतर्गत, हायपरवाइजर सव्यंरित्या या मुल्य करीता स्थापीत केले गेले आहे, ज्यामुळे या अडचणीचे निर्धारण झाले आहे.

  • जास्त CPUs चे प्रमाण असलेल्या मशीनवर आभासीकरणचा वापर केल्यामुळे अतिथी प्रतिष्ठापनवेळी हायपरवाइजर क्रॅश झाले. या अद्ययावतात, वरील अडचणीचे निर्धारण झाले आहे.

  • जास्त स्मृतीची आवश्यकता असणाऱ्या अतिथीचे निर्माण करतेवेळी softlockup आढळू शकते. यामुळे, त्रुटीचे call trace दोन्ही dom0 व अतिथीवर दर्शविले गेले. या अद्ययावत अंतर्गत, वरील अडचणीचे निर्धारण झाले आहे.

  • Intel प्रोसेसर जे CPUID समुह मुल्य 6 पुरविते, kernel-xen अतंर्गत फक्त एकच कार्यक्षमात counter रेजिस्टर कार्यान्वीत करते. यामुळे, फक्त counter 0 सॅम्पल पुरविले जाते. या अद्ययावतात, वरील अडचणीचे निर्धारण झाले आहे.

5.2.2. x86 मांडणी

  • नविन CPU असलेल्या प्रणालींवर, CPU APIC ID हे CPU ID पेक्षा वेगळे आहे. यामुळे, आभासी कर्नल CPU फ्रिक्वेंसी प्रमाण प्रारंभ करण्यास अपयशी ठरला. या अद्ययावतात, आभासी कर्नल आता हायपरवाइजर पासून CPU APIC ID प्राप्त करतो, व CPU फ्रिक्वेंसी योग्यरित्या प्रमाणीत करण्यास परवानगी देतो.

  • x86 पॅरावर्च्युअलाइजड् अतिथी चालवितेवेळी, कार्यपद्धतीने अवैध स्मृती करीता प्रवेश प्राप्त केल्यास, SEGV संकेत प्राप्त करण्याऐवजी ते चक्र नुरूप कार्य करेल. यामुळे ज्यारितीने execshield तपास हायपरवाइजर अंतर्गत केले जात असे त्यात त्रुटी आढळून आली. या अद्ययावतात, वरील अडचणीचे निर्धारण झाले आहे.

5.2.3. ia64 मांडणी

  • xend बग ज्यामुळे पूर्वी अतिथी प्रतिष्ठापन अडचणी निर्माण झाले आता त्याचे निर्धारण केले गेले आहे.

  • evtchn घटना मार्ग साधन अंतर्गत लॉक व स्मृती रोधक आढळले नाही. यामुळे xenstore प्रतिसाद देणे बंद झाले. या अद्ययावतात, या अडचणीचे निर्धारण केले गेले आहे.

  • Non-Uniform Memory Access (NUMA) माहिती xm info आदेश द्वारे दर्शविली गेली नाही. यामुळे, प्रत्येक नोड करीता node_to_cpu मुल्य अयोग्यरित्या no cpus यानुरूप पुरविले जात असे. या अद्ययावतात, वरील अडचणीचे निर्धारण झाले आहे.

  • पूर्वी, Hardware Virtual Machine (HVM) वर अतिथी बनविणे VT-i2 तंत्रज्ञाण समाविष्टीत असलेल्या प्रसोसरवर अपयशी ठरत असे. या अद्ययावतात, वरील अडचणीचे निर्धारण झाले आहे.

5.2.4. x86_64 मांडणी

  • अतिथी आभासी मशीन करीता उपलब्ध गतिक IRQs समाप्त झाल्यास, the dom0 कर्नल क्रॅश होऊ शकतो. या अद्ययावत अंतर्गत, क्रॅश स्तिथी ठरविण्यात आली असून, उपलब्ध IRQs मध्ये वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे वरील अडचणीचे निर्धारण शक्य होते.

  • नविन CPU असलेल्या प्रणालींवर, CPU APIC ID हे CPU ID पेक्षा वेगळे आहे. यामुळे, आभासी कर्नल CPU फ्रिक्वेंसी प्रमाण प्रारंभ करण्यास अपयशी ठरला. या अद्ययावतात, आभासी कर्नल आता हायपरवाइजर पासून CPU APIC ID प्राप्त करतो, व CPU फ्रिक्वेंसी योग्यरित्या प्रमाणीत करण्यास परवानगी देतो.

5.3. परिचीत अडचणी

5.3.1. सर्व मांडणी

  • आभासी कर्नलचा वापर करतेवेळी डिस्केट ड्राइव्ह मिडीया प्रवेशजोगी नसतील. यावर उपय असा की त्याऐवजी, USB-जुळलेले ड्राइव्हचा वापर करा.

    लक्षात ठेवा डिस्केट ड्राइव मिडीया विना-आभासी कर्नलसह योग्यरित्या कार्य करेल.

  • पॅरावर्च्युअलाइजड् अतितीचे प्रत्यक्ष स्थानांतरनवेळी, परस्पर यजमान (dom0) वेळेस समजुळवणी स्थापीत न केल्यास, वेळेवर-आधारीत अतिथी कार्यपद्धती अयोग्यरित्या कार्य करतील. स्थानांतरन पूर्वी सर्व परस्पर यजमान करीता प्रणाली वेळची समजुळवणी करण्याकरीता NTP चा वापर करा.

  • दोन अतिथी अंतर्गत एक अतिथी स्थानांतरीत केल्यास दुसरा गोंधळात पडू शकतो. अतिथीला प्रणालीच्या बाहेर हलविल्या नंतर व त्यास हलविण्यापूर्वी यजमानाला रीबूट केल्यास, गोंधळ निर्माण होणार नाही.

  • डिस्क स्वरूपीत करतेवेळी Windows 2008 किंवा Windows Vista यास अतिथी म्हणून व अतिथीला बहु आभासी CPUs सह चालविल्यास क्रॅश होऊ शकते. यावर उपाय म्हणून, अतिथीला स्वरूपनवेळी एकमेव आभासी CPU सह बूट करा.

  • virt-manager द्वारे निर्मीत पूर्णतया आभासी अतिथी बहुतांशवेळी माऊसला पडद्यावर पूर्णपणे स्वतंत्ररित्या हालाचाली करण्यापासून रोखतो. यावर उपाय म्हणून, अतिथी करीता टॅबलेट साधन संयोजीत करण्याकरीता virt-manager चा वापर करा.

  • 128 किंवा त्यापेक्षा जास्त CPU प्रणालींचा वापर करत असल्यास कमाल CPUs ची संख्या 128 पेक्षा कमी असायला हवे. याक्षणी कमाल समर्थनजोगी संख्या 126 अशी आहे. Hypervisor ला 126 पर्यंत मर्यादीत ठेवण्याकरीता maxcpus=126 हायपरवाइजर बाबचा वापर करा

  • क्षेत्र स्तब्ध केल्यामुळे व न केल्यामुळे गमवलेल्या वेळची भरपाई पूर्णतया आभासी अतिथी द्वारे होऊ शकत नाही. पॅरावर्च्युअलाइजड् कर्नलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे योग्यरित्या pause व unpause घटना अंतर्गत वेळेचे नियंत्रण करण्याची क्षमता. ही अडचण अपस्ट्रीमनुरूप बदलविण्याजोगी टाइमर द्वारे हाताळली जात आहे, यामुळे पूर्णतया आभासी अतिथीकडे पॅरावर्च्युअलाइजड् टाइमर असु शकते. याक्षणी, या कोडवर अपस्ट्रीम विकास चालू आहे व Red Hat Enterprise Linux च्या पुढिल आवृत्तीत उपलब्ध होईल.

  • पॅरावर्च्युअलाइजड् अतिथी ला पुन्हा पुन्हा स्थानांतरीत केल्यास dom0 कन्सोल वर bad mpa संदेश दर्शविण्यास कारणीभूत ठरू शकते. काहिक घटना मध्ये, हायपरवाइजर पॅनीकही होऊ शकतो.

    हायपरवाइजर कर्नल पॅनीक टाळण्याकरीता, चुकीचे mpa संदेश प्रदर्शित होतेवेळी स्थानांतरीत अतिथी पुन्हप्रारंभ करा.

  • dom0 वर संवाद बांधणी स्थापीत करतेवेळी, मुलभूत network-bridge स्क्रीप्ट बांधणीय संजाळ संवादास वैक्लपीरित्या अनुपलब्धउपलब्ध यानुरूप बदलविले जाऊ शकते. यालाच सहसा flapping असे म्हटले जाते.

    हे टाळण्याकरीता, मानक network-script ओळ यांस /etc/xen/xend-config.sxp अंतर्गत खालिल ओळसह बदलवा:

    (network-script network-bridge-bonding netdev=bond0)

    असे केल्यास netloop साधन अकार्यान्वीत होईल, ज्यामुळे Address Resolution Protocol (ARP) नियंत्रण यास पत्ता स्थानांतरन प्रक्रिया अपयशी होण्यापासून वगळले जाऊ शकते.

  • एकापेक्षा जास्त अतिथी क्षेत्र चालवितेवेळी, अतिथी संजाळ तात्पुर्तेरित्या कार्य करण्यास बंद होऊ शकते, ज्यामुळे dom0 लॉग अंतर्गत खालिल त्रुटी दर्शविले जाते:

    Memory squeeze in netback driver
    यावर उपाय म्हणून, dom0 करीता उपलब्ध स्मृतीचे प्रमाण dom0_mem हायपरवाइजर आदेश ओळ पर्याय द्वारे वाढवा.

5.3.2. x86 मांडणी

  • पॅरावर्च्युअलाईज अतिथी xm migrate [domain] [dom0 IP address] द्वारे कार्य करीत नाही.

  • पूर्णतया आभासी SMP अतिथी येथे Red Hat Enterprise Linux 5 प्रतिष्ठापीत करतेवेळी, प्रतिष्ठापन स्तब्ध होऊ शकते. हे सहसा यजमान वरील (dom0) Red Hat Enterprise Linux 5.2 कार्यरत असतेवेळी होऊ शकते.

    हे टाळण्याकरीता, अतिथीस एकसंख्यी प्रोसेसर वापरण्याकरीता निश्चित करा. तुम्ही हे virt-install मधिल --vcpus=1 पर्याय वापरून करू शकता. एकदाचे प्रतिष्ठापन पूर्ण झाल्यास, virt-manager मध्ये निर्धारीत vcpus संपादीत करून तुम्ही अतिथीस SMP करीता निश्चित करू शकता.

5.3.3. x86_64 मांडणी

  • पॅरावर्च्युअलाईज अतिथी xm migrate [domain] [dom0 IP address] द्वारे कार्य करीत नाही.

  • आभासीकरण वैशिष्ट्य प्रतिष्ठापित करणे नमुना क्रमांक xw9300 आणि xw9400 च्या HP प्रणाल्यांवर time went backwards या सुचनेस कारणीभूत होऊ शकते.

    या समस्येवर xw9400 मशीनींवर उपाय म्हणून, BIOS रचनांस HPET टाइमर कार्यान्वित करण्यास व्युहरचित करा. नोंद करा की हा पर्याय xw9300 मशीनींवर उपलब्ध नाही.

  • Red Hat Enterprise Linux 3.9 चे पूर्णतया आभासी अतिथी खात्यावरील प्रतिष्ठापन खूपच हुळूवारपणे होते. याच्या व्यतिरीक्त, प्रतिष्ठापन नंतर अतिथी बूट केल्यास hda: lost interrupt नुरूप त्रूटी आढळू शकतील.

    ही बूट त्रूटी नाहीसी करण्यासाठी, अतिथी खाते SMP कर्नल वापरण्यास संचयीत करा.

  • Red Hat Enterprise Linux 5.2 करीता यजमान (dom0) प्रणालीस सुधारीत करतेवेळी Red Hat Enterprise Linux 4.5 SMP पॅरावर्च्युअलाइजीड् अतिथी बूटजोगी नाही असे दर्शवितो. यजमान प्रणालीवर 4GB पेकक्षा जास्त RAM असल्यावरच वरील होते.

    यावर उपाय म्हणून, प्रत्येक Red Hat Enterprise Linux 4.5 अतिथीला एकच CPU पद्धतीत बूट करा व त्यातील कर्नलला अलिकडील प्रकाशीत आवृत्तीशी (Red Hat Enterprise Linux 4.5.z करीता) सुधारीत करा.

5.3.4. ia64 मांडणी

  • पॅरावर्च्युअलाईज अतिथी xm migrate [domain] [dom0 IP address] द्वारे कार्य करीत नाही.

  • Itanium प्रणालींवरील VGA करीता कंनसोल आऊटपूट संचयीत करतेवेळी, dom0 आभासी कर्नल बूट होतेवेळी अकार्यक्षम असू शकतो. याचे कारण Extensible Firmware Interface (EFI) रचनांपासून आभासी कर्नल मूलभूत कंसोल साधण ओळखू शकला नाही.

    असे झाल्यास, console=tty हा बूट घटक कर्नल बूट पर्याय मधिल /boot/efi/elilo.conf येथे जोडा.

  • काहिक Itanium प्रणालीवर (जसे की Hitachi Cold Fusion 3e), EFI व्यवस्थापन व्यवस्थापक द्वारे VGA कार्यान्वीत झाल्यावर dom0 मध्ये सीरीयल पोर्ट आढळले जाणार नाही. तरी, तुम्हाला dom0 कर्नल करीता खालिल सीरीयल पोर्ट विषयी माहिती प्रविष्ट करावी लागेल:

    • बीटस्/सेकंद मध्ये गती

    • डेटा बीटची संख्या

    • पॅरीटी

    • io_base पत्ता

    हे तपशील कर्नल मधिल /boot/efi/elilo.conf येथे dom0 अंतर्गत append= ओळी मध्ये निर्देशीत केले पाहिजे. उदाहरणार्थ:

    append="com1=19200,8n1,0x3f8 -- quiet rhgb console=tty0 console=ttyS0,19200n8"

    उदाहरणार्थ, com1 सीरीअल पोर्ट आहे, 19200 गती (बीटस्/सेकंद), 8n1 माहिती बीट/पॅरीटी संयोजना करीता दर्शवितो, व 0x3f8 हा io_base पत्ता आहे.

  • आभासीकरण जे Non-Uniform Memory Access (NUMA) चा वापर करतात काहिक मांडणीवर कार्य करत नाही. तरी, NUMA चा वापर करणारे आभासी कर्नल प्रतिष्ठापीत केल्यास बूट अपयशी ठरेल.

    काहिक प्रतिष्ठापन क्रमांक आभासी कर्नल मुलभूतरित्या प्रतिष्ठापीत करतात. तुमच्याकडे प्रतिष्ठापन क्रमांक असल्यास व प्रणाली NUMA चा वापर करत असल्यास व kernel-xen सह यशस्वीरित्या कार्य करत नसल्यास, प्रतिष्ठापनवेळी आभासीकरण पर्याय निवडू नका.

  • सद्या, या मांडणीस आभासीकरण करीता पूर्णतया आभासी अतिथी समर्थित नाही. याच्या व्यतिरिक्त आभासीकरण करीता, या मांडणीवर kexeckdump देखिल समर्थित नाही.

6. तंत्रज्ञाण पूर्वदृश्य

तंत्रज्ञाण पूर्वदर्शन वैशिष्ट्ये वर्तमाणक्षणी Red Hat Enterprise Linux द्वारे समर्थीत नाही, कार्यपद्धती पूर्ण नसेल, व सामान्यतया उत्पादन उपयोग करीता योग्य नाही. तरीही, हे वैशिष्ट्य ग्राहकाच्या सोयीसाठी व अधिक प्रचार करीता समाविष्ट केले गेले आहेत.

ग्राहकांसाठी ही वैशिष्ट्ये गैर-उत्पादन पर्यावरणात उपयुक्त ठरू शकतात. ग्राहक तंत्रज्ञाण पूर्वदर्शन वैशिष्ट्यांसाठी ते पूर्णतः समर्थित होण्याआधी प्रतिसाद आणि कार्यशीलता सुचना देण्यासदेखील मुक्त आहेत. अतिउपद्रवी सुरक्षा मामल्यांसाठी एराटा पुरवले जातील.

तंत्रज्ञाण पूर्वदृश्य गुणविशेषच्या विकासवेळी, वापरकर्ता द्वारे चाचणी करीता अगाऊ घटक उपलब्ध होऊ शकतात. Red Hat चे उद्देश तंत्रज्ञाण पूर्वदृश्य गुणविशेषला भविष्यातील आवृत्ती करीता पूर्णतया समर्थन पुरविणे आहे.

EMC Clariion वरील ALUA पध्दती

active-passive failover (ALUA) पध्दती EMC Clariion संचयन वरील dm-multipath चा वापर करून आता उपलब्ध आहे. ही पध्दती T10 गुणविशेषनुरूप पुरविली जाते, पण या प्रकाशनात फक्त तंत्रज्ञान पूर्वदृश्य म्हणून पुरविले जाते.

T10 विषयी अधिक माहितीकरीता, http://www.t10.org पहा.

ext4

ext फाइलप्रणालीचे अलिकडील आवृत्ती, ext4, या प्रकाशनात तंत्रज्ञाण पूर्वदृश्य नुरूप उपलब्ध आहे. Ext4 हे Red Hat व Linux समाज द्वारे निर्मीत ext3 फाइल प्रणलीची वाढिव सुधारणा आहे. तंत्रज्ञाण पूर्वदृश्य करीता फाइल प्रणालीचे प्रकाशन नाव ext4dev असे आहे.

फाइल प्रणाली ext4dev.ko कर्नल विभाग, व नविन e4fsprogs संकुल, द्वारे पुरविले जाते, ज्यात ext4 सह वापरणी करीता e2fsprogs प्रशासक साधनाची अद्ययावतीत आवृत्ती समाविष्टीत आहे. वापरायचे असल्यास, e4fsprogs प्रतिष्ठापीत करा व त्यानंतर ext4-base फाइल प्रणाली बनविण्याकरीता e4fsprogs कार्यक्रमातील mkfs.ext4dev आदेशचा वापर करा. When referring to the mount आदेशओळ किंवा fstab फाइल वरील फाइलप्रणालीचा संदर्भ देतेवेळी, फाइलप्रणली नाव ext4dev चा वापर करा.

FreeIPMI

FreeIPMI आता या अद्ययावत मध्ये तंत्रज्ञाण पूर्वदृश्य म्हणून समाविष्टीत आहे. FreeIPMI हा Intelligent Platform Management IPMI प्रणाली सॉफ्टवेअरचा संग्रह आहे. Platform Management Interface (IPMI v1.5 and v2.0) मानकशी सहत्व विकसीत लायब्ररीसह in-band व out-of-band सॉफ्टवेअर पुरवितो.

FreeIPMI विषयी अधिक माहितीकरीता, http://www.gnu.org/software/freeipmi/ पहा

TrouSerS व tpm-tools

Trusted Platform Module (TPM) हार्डवेअरचा वापर करण्याकरीता TrouSerStpm-tools या प्रकाशनात समाविष्टीत केले गेले आहे. TPM हार्डवेअर मध्ये खालिल गुणविशेष समाविष्टीत केले गेले आहे (इतर गुणविशेष पैकी):

  • निर्माण, संचयन, व RSA किल्लीचा सुरक्षित वापर (स्मृती मध्ये कुठेही याचा गैरवापर विना)

  • क्रिप्टोग्राफिक हॅशचा वापर करून प्लॅटफॉर्म ' सॉफ्टवेअर स्थितीची तपासणी

TrouSerS हे Trusted Computing Group's Software Stack (TSS) गुणविशेष लागू करते. TPM हार्डवेअरचा वापर करणासाठी TrouSerS चा वापर केला जाऊ शकतो. tpm-tools संकुलचा वापर TPM हार्डवेअरच्या नियंत्रण व वापर करीता केला जातो.

TrouSerS विषयी अधिक माहितीकरीता, कृपया http://trousers.sourceforge.net/ पहा.

eCryptfs

eCryptfs Linux करीता स्टॅक क्रिप्टोग्राफिक फाइल प्रणाली आहे. व्यक्तिगत संचयीका EXT3 सारखे फाइल प्रणाली येथे माउन्ट केले जाते; eCryptfs चा वापर करण्यसाठी वर्तमान विभाजन किंवा फाइल प्रणाली बदलविण्याची आवश्यकता नाही.

या प्रकाशनसह, eCryptfs यांस अपस्ट्रीम आवृत्ती 56 नुरूप आधारीत केले गेले आहे, जे अनेक बग निर्धारण व सुधारणा पुरविते. याच्या व्यतिरिक्त, हे अद्ययावत eCryptfs संयोजीत करण्यास चित्रलेखीय कार्यक्रम पुरविते (ecryptfs-mount-helper-gui).

हे अद्ययावत ठराविक eCryptfs mount पर्यायची रचना देखील बदलविते. eCryptfs ची ही आवृत्ती सुधारीत करायची असल्यास, प्रभावीत कुठलेही mount स्क्रीप्ट व /etc/fstab नोंदणी अद्ययावतीत केले पाहिजे. या बदलाव विषयी अधिक माहिती करीता, man ecryptfs पहा.

खालिल सावधानता नियमावली eCryptfs च्या या प्रकाशन करीता लागू होते:

  • लक्षात ठेवा eCryptfs फाइल प्रणाली एनक्रीप्टेड फाइल प्रणाली यास समान नावचे अंतर्भूतीत संचयीका अंतर्गत आरोहीत असल्यावरच कार्यान्वीत होते. उदाहरणार्थ:

    mount -t ecryptfs /mnt/secret /mnt/secret

    फाइल प्रणालीचे सुरक्षीत भाग दर्शवू नका, म्हणजेच त्यास इतर आरोहन बिन्दू, बाइन्ड बिन्दू, व त्यानुरूप स्थानी आरोहीत करू नका.

  • संजाळ फाइल प्रणालींवर (उ.दा. NFS, Samba) eCryptfs आरोहन योग्यरित्या कार्य करणार नाही .

  • eCryptfs कर्नल ड्राइवरला अद्ययावत वापरकर्ताक्षेत्राची आवश्यकता आहे, जे ecryptfs-utils-56-4.el5 किंवा पुढिल द्वारे पुरविले जाते.

eCryptfs विषयी अधिक माहिती करीता, http://ecryptfs.sf.net पहा. मुळ मांडणी विषयी माहिती करीता http://ecryptfs.sourceforge.net/README and http://ecryptfs.sourceforge.net/ecryptfs-faq.html देखिल पहा.

Stateless Linux

Stateless Linux हा प्रणाली कशी चालवावी आणि व्यवस्थापित करावी यादृष्टीने विचार करण्याचा नविन मार्ग आहे, जो मोठ्या प्रमाणावरील प्रणाली यांस बदलाव करीता सज्ज करून त्यांचा पुरवठा व व्यवस्थापन सुलभ करतो. हे प्राथमिकतया तयार प्रणाली प्रतिमा, ज्या मोठ्या प्रमाणावरील स्थितीविहीन प्रणाल्यांमध्ये प्रतिलिपीत व व्यवस्थापित होतात, व कार्यकारी प्रणालीस फक्त-वाचनीय स्वरूपात चालविते. (कृपया अधिक माहितीसाठी /etc/sysconfig/readonly-root पहा).

विकासाच्या सद्यस्थितीत, स्थितीविहीन वैशिष्ट्ये अपेक्षित लक्ष्याचे उपसंच आहेत. या तऱ्हेने, या क्षमतेस तंत्रज्ञाण पूर्वदृश्य असे संबोधले जात आहे.

हे अत्यंत शिफारसीय आहे कि ज्यांना स्थितीविहीन कोड परिक्षणात(टेस्टींग) रस असेल त्यांनी http://fedoraproject.org/wiki/StatelessLinux/HOWTO येथे HOWTO वाचावे व stateless-list@redhat.com येथे स्वतःची नोंदणी करा.

Red Hat Enterprise Linux 5 मध्ये मुळस्वरूपी प्रारंभवेळी परिचयास आणलेले Stateless Linux करीताचे कार्यन्वीत करण्याजोगी घटक.

AIGLX

AIGLX हे एरवी पूर्णतः समर्थित X सेवकाचे तंत्रज्ञाण पूर्वदर्शन वैशिष्ट्य आहे. हे मानक डेस्कटॉपवर GL-संवेगीत प्रभाव देण्यावर लक्ष देते. प्रकल्पात खालिल बाबींचा समावेश होतो:

  • हलके संपादीत केलेले X सर्वर.

  • अद्ययावतीत Mesa संकुल जे नविन प्रोटोकॉल समर्थन जोडते.

हे घटक प्रतिष्ठापित केल्याने, तुम्हास खूप कमी बदलांसह GL-संवेगीत प्रभाव तुमच्या डेस्कटॉपवर मिळू शकतात, तसेच त्यांना तुमचा X सेवक बदली न करता कार्यान्वित किंवा अकार्यान्वित करण्याची क्षमता मिळेल. AIGLX हार्डवेयर GLX संवेगाचा लाभ घेण्यासाठी दूरस्थ GLX अनुप्रयोगदेखील कार्यान्वित करतो.

iSCSI लक्ष्य

Linux लक्ष्य (tgt) फ्रेमवर्क प्रणालीस ब्लॉक-स्तरीय SCSI संचयनतर्फे इतर प्रणालींकरीता जी SCSI प्रबंधक समर्थित आहे त्यांस सेवा प्रदान करण्यास परवानगी देतो. ही कार्यशैली सुरूवातीला Linux iSCSI लक्ष्यास निश्चित केली आहे, जे संजाळावरील कुठलेही iSCSI प्रबंधकाकरीता संचयनास पात्र ठरवू शकते.

iSCSI लक्ष्य संचयीत करण्यकरीता, scsi-target-utils RPM प्रतिष्ठापीत करा व खालिल नीयम पहा:

  • /usr/share/doc/scsi-target-utils-[version]/README

  • /usr/share/doc/scsi-target-utils-[version]/README.iscsi

[version] ला प्रतिष्ठापित संकुलाच्या परस्पर संबंधीत आवृत्तीशी बदलवा.

अधिक माहितीकरीता, man tgtadm पहा.

FireWire

firewire-sbp2 घटक या अद्ययावतात तंत्रज्ञान पूर्वदृश्य या स्वरूपात समाविष्टीत आहे. हा घटक FireWire संचयन साधणांकरीता व स्कॅनर करीता संपर्क पुरवितो.

सध्या, FireWire खालिल समर्थित करत नाही:

  • IPv4

  • pcilynx यजमान नियंत्रक

  • multi-LUN संचयन साधणे

  • संचयन साधणांकरीता विशेष प्रवेश नाही

याच्या व्यतिरीक्त, खालिल मुद्दे FireWire च्या या आवृत्तीत आवर्जून आढळतात:

  • SBP2 ड्राइवर मधिल स्मृतीची गऴती प्रणालीला स्तब्ध करू शकते.

  • या आवृत्तीतील कोड big-endian प्रणालींवर व्यवस्थित काम करत नाही. यामुळे PowerPC ची अनिश्चित वागणूक आपल्याला पहायला मिळते.

ktune

या प्रकाशनात ktune (ktune संकुल पासून) समाविष्टीत आहे, सेवा जे ठराविक प्रणाली प्रोफाइल करीता योग्य कर्नल ट्यूनींग घटक निश्चित करतो. वर्तमानक्षणी, ktune फक्त मोठे-स्मृती डिस्क-केंद्रीत व संजाळ-केंद्रीत अनुप्रयोग चालविणाऱ्या प्रणाली करीता प्रोफाइल पुरवितो.

ktune द्वारे पुरविलेली संयोजना /etc/sysctl.conf येथील निश्चित किंवा कर्नल आदेश द्वारे निश्चित संयोजनास खोडून पुन्हा लिहीले जात नाही. ktune काहिक प्रणाली व वर्कलोड करीता योग्य नसावे; तरी, वापर करण्यापूर्वी त्याची कठोर तपासणी करा.

ktune द्वारे तुम्ही कुठलिही संयोजना संच अकार्यान्वीत करू शकता व ktune सेवेला थांबवून पूर्वीच्या सर्वसाधारण संयोजना वापरू शकता व त्याकरीता service ktune stop (रूट नुरूप) चालवा.

dmraid करीता SGPIO समर्थन

Serial General Purpose Input Output (SGPIO) हे industry मानक संभाषन पद्धती आहे ज्याचा वापर मुख्य बोर्ड व आंतरीक व बाहेरील हार्ड डिस्क ड्राइव्ह बे एनक्लोशर अंतर्गत केला जाऊ शकतो. या पद्धतीचा वापर AHCI ड्राइवर संवादतील एनक्लोशर द्वारे LED लाइट नियंत्रीत करण्याकरीता केला जाऊ शकतो.

या प्रकाशन मध्ये, dmraid अंतर्गत SGPIO समर्थन यांस तंत्रज्ञाण पूर्वदृश्य म्हणून समाविष्ट केले गेले आहे. यामुळे dmraid ला डिस्क मांडणीसह योग्यरित्या कार्य करण्यास मदत होते.

GCC 4.3

Gnu Compiler Collection version 4.3 (GCC4.3) आता या प्रकाशनात तंत्रज्ञाण पूर्वदृश्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. कंपाइलरच्या या संच अंतर्गत C, C++, व Fortran 95 कंपाइलर समर्थन लायब्ररीसह समाविष्ट करण्यात आले आहे.

लक्षात ठेवा gcc43 संकुलात, gnu89-inline करीता मुलभूत पर्याय -fgnu89-inline करीता बदलविले गेले आहे, व Red Hat Enterprise Linux 5 करीता अपस्ट्रीम व भविष्यातील अद्ययावत -fno-gnu89-inline करीता मुलभूतरित्या स्थापीत केले जातिल. Red Hat Enterprise Linux 5 अंतर्गत बरेचशे हेड्डर ISO C99 रचना ऐवजी GNU इन-लाइन रचनाची अपेक्षा करत असल्यामुळे वरील आवश्यक आहे. हेड्डर गुणधर्म द्वारे GNU इन-लाइन रचना स्वीकारण्यास सुस्थीत केले गेले नाही.

कर्नल ट्रेसपॉईन्ट सुविधा

या अद्ययावत अंतर्गत, नविन कर्नल marker/tracepoint सुविधा तंत्रज्ञाण पूर्वदृश्य म्हणून लागू करण्यात आली आहे. हे संवाद कर्नल अंतर्गत SystemTap नुरूप साधन सह वापरण्याकरीता, तात्पुर्ते शोध पॉईन्ट जोडते.

Fibre Channel over Ethernet (FCoE)

Fibre Channel over Ethernet (FCoE) ड्राइवर, libfc सह, FCoE यांस मानक Ethernet कार्डसह चालविण्याची क्षमता पुरवितो. ही क्षमता Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत तंत्रज्ञाण पूर्वदृश्य म्हणून पुरविले जाते.

Red Hat Enterprise Linux 5.3 तीन हार्डवेअर लागूकरण वरील FCoE करीता पूर्णतया समर्थन पुरवितो. हे खालिन नुरूप आहेत: Cisco fnic ड्राइवर, Emulex lpfc ड्राइवर, व Qlogic qla2xx ड्राइवर.

RAID संचाचे साधन अपयशी नियंत्रण

साधन अपयशी नियंत्रण, dmraid व dmevent_tool नुरूप साधनांचा वापर, Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत तंत्रज्ञाण पूर्वदृश्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे RAID संचातील घटक साधन संबंधी अपयशी अहवाल पाहण्यास व कळविण्यास सुविधा पुरविते.

7. निर्धारीत अडचणी

7.1. सर्व मांडणी

  • TTY साधन कार्यपद्धती अहवाल करीता माहिती योग्यरित्या निर्माण नव्हती होत. तसेच, आदेश sar -y अपयशी ठरले, व खालिल त्रुटी दर्शविते:

    विनंतीकृत क्रिया फाइल अंतर्गत उपलब्ध नाही

    या अद्ययावत संकुलात, sar यांस योग्य करण्यात आले आहे ज्यामुळे -y पर्याय TTY साधन क्रिया दर्शवितो.

  • पूर्वी, max_fds ला unlimited असे /etc/multipath.conf येथे संयोजीत केल्यास multipathd डीमनला सुरू करण्यापासून रोखत असे. open file descriptors यांस प्रणाली कमाल मुल्याशी निश्चित करायचे असल्यास, max_fds ला max यानुरूप निश्चित करावे लागेल.

  • mod_perl आता आवृत्ती 2.0.4, अलिकडील अपस्ट्रीम प्रकाशन यानुरूप आधारीत केले गेले आहे. या अद्ययावत मध्ये बरेच अद्ययावतचे समावेषण केले आहे, ज्यात त्रुटी निर्धारण समाविष्टीत आहे ज्यामुळे आता mod_perl Bugzilla 3.0 शी योग्यरित्या कार्य करते.

  • cups आता आवृत्ती 1.3.7 करीता पुन्हा आधारीत केले गेले आहे. या अद्ययावतात अनेक बग निर्धारण व सुधारणा समाविष्टीत आहे, मुख्यतया:

    • Kerberos अधिप्रमाणता आता समर्थीत आहे.

    • वापरकर्ता-केंद्रीत छपाईयंत्र व कार्य करार आता योग्यरित्या दाखल केले जाते.

    • संचारन अकार्यान्वीत केले असल्यास दूरस्थ queue कॅश दाखल केले जात नाही.

    • classes.conf संयोजना फाइलची परवानगी आता योग्य आहे.

  • lm_sensors यास आवृत्ती 2.10.7 नुरूप आधारीत केले गेले आहे. या अद्ययावत अंतर्गत बरेच अपस्ट्रीम सुधारणा व बग निर्धारण समाविष्टीत आहे, जे k8temp दाखल केल्यावर libsensors ला क्रॅश होण्यापासून व सर्वसाधारण वाचन त्रुटी संदेश दर्शविण्यापासून रोखते.

  • खालिल बगच्या निर्धारण करीता elfutils यांस अद्ययावत केले गेले आहे:

    • ठराविक इन्पुट फाइल वाचतेवेळी eu-readelf कार्यक्रम क्रॅश होऊ शकते.

    • eu-strip उपकार्यक्रम rpmbuild कार्यपद्धती अंतर्गत वापरले जाते जे नविन बायनरी संकुल बनविते. -debuginfo संकुल बनविण्याकरीता, उपकार्यक्रम डीबगींग माहिती कार्यान्वीतजोगी कोड पासून वेगळी केली जाते. या उपकार्यक्रमातील बगमुळे s390 मांडणी वरील ET_REL फाइल करीता डीबगींग माहिती पुरविली जाऊ शकत नाही; यामुळे Linux कर्नल विभागातील फाइल (.ko.debug) प्रभावीत होते, व s390 वरील Systemtap शी kernel-debuginfo संकुल योग्यरित्या कार्य करणार नाही.

  • vnc-server यांस आवृत्ती 4.1.2-14.el5 नुरूप आधारीत केले गेले आहे. या अद्ययावतात खालिल निर्धारण समाविष्टीत आहे:

    • Xvnc कार्यक्रम चालविण्यास अपयशी ठरल्यावर vncserver ला छपाई करण्यापासून रोखणाऱ्या बगचे आता निर्धारण झाले आहे.

    • Xvnc यापुढे चुकीचे root window depth चा वापर करत नाही; ते आता -depth पर्याय द्वारे योग्य window depth चा वापर करते.

    • बग ज्यामुळे libvnc.so विभाग X सर्वरला क्रॅश करते आता त्यास निर्धारीत केले गेले आहे.

    • Xvnc आता सर्व मांडणीवर GLX व RENDER विस्तारण करीता समर्थन पुरविते.

  • smartmontools यांस आवृत्ती 5.38 यानुरूप आधारीत केले गेले आहे. हे अद्ययावत हार्डवेअर साधनचे स्वयंशोध, CCISS RAID arrays करीता समर्थन सुधारीत करते, व तसेच समर्थीत साधनचे मोठे माहितीकोष पुरविते.

    हे अद्ययावत SELinux द्वारे smartmontools यांस 3ware RAID साधनचे नियंत्रण रोखणारे बगचे निर्धारण समाविष्टीत आहे. smartmontools आता या प्रकारचे साधन योग्यरित्या नियंत्रीत करू शकतो.

  • python-urlgrabber यांस आवृत्ती 3.1.0-5 करीता पुन्हा आधारीत करण्यात आले आहे. यात अपस्ट्रीम पासून अनेक बग निर्धारण समाविष्टीत आहे, मुख्यतया:

    • yum आता अपुरे डाऊनलोड करीता समर्थन न पुरविणाऱ्या yum रेपॉजिटरी पासून पुन्हा योग्यरित्या डाऊनलोड करू शकतो.

    • ठराविक पोर्टसह yum रेपॉजिटरी FTP-आधारीत असल्यावरही yum आता व्यत्य नुरूप आढळलेले डाऊनलोड पुन्हा सुरू करू शकतो.

    • विकास पट्टीचा आकार आता टर्मिनल रूंदीशी संलग्न आहे. याच्या व्यतिरीक्त, विकास पट्टी आता आणखी देखणीय, व एकूण डाऊनलोड केलेल्या माहितीची टक्केवारी देखील दर्शवितो.

    • python-urlgrabber चे keepalive संकेत आता ठिक केले गेले आहे. पूर्वी, डाऊनलोडवेळी या संकेत अंतर्गत बग अयोग्यरित्या स्मृती वापर वाढवित असे; याच्या व्यतिरीक्त, हे बग reposyncyumdownloader यांस मोठ्या प्रमाणात संकुल डाऊनलोड करतेवेळी योग्यरित्या कार्य पासून रोखत असे.

  • yum-utils आता अपस्ट्रीम आवृत्ती 1.1.16 करीता आधारीत केले गेले आहे. यात अनेक बग निर्धारण समाविष्टीत आहे, मुख्यतया:

    • yum update --security आता योग्यरित्या जुने संबंधित सुरक्षा अद्ययावत शोधू शकतो.

    • yum-versionlock आता योग्यरित्या वापरणीत नसलेले संकुलशी कार्य करते.

    या अद्ययावतात yum-fastestmirror प्लगइन समाविष्टीत आहे, ज्यामुळे yum ला मिररयादीतील सर्वात जलद रेपॉजिटरीचा वापर निवडणे शक्य होते.

  • Samba अपस्ट्रीम आवृत्ती 3.2.0 नुरूप आधारीत केले गेले आहे. यामुळे अनेक बगचे निर्धारण शक्य झाले आहे, जसे की Windows 2003 चा नाव सर्वर नुरूप वापर करणारे क्षेत्रावरील वापरकर्त्यांना रोखणे. net rpc changetrustpw चा वापर करून प्रणाली गुप्तशब्द बदलविल्यास samba क्षेत्र सदस्यता मोडत असलेले बगचे निर्धारण देखिल या अद्ययावतात समाविष्ट आहे.

    या प्रकाशनात समाविष्टीत अधिक अपस्ट्रीम samba अद्ययावत यादी करीता, http://www.samba.org/samba/history/samba-3.0.32.html पहा

  • OpenLDAP अपस्ट्रीम आवृत्ती 2.3.43 करीता आधारीत केले गेले आहे. यात अनेक बग निर्धारण समाविष्टीत आहे, मुख्यतया:

    • slapd डिमन TLS प्रमाणपत्र फाइल वाचू शकत नसल्यास init आता सक्रिप्ट सावधानता दर्शविते .

    • openldap-debuginfo संकुल अंतर्गत सर्व लायब्ररी आता unstripped केले गेले आहे.

    • openldap-devel संकुल काढून टाकल्यास OpenLDAP लायब्ररी मोडत नाही.

    Red Hat आता OpenLDAP सर्वर करीता अगाऊ overlays चे वितरण करतो. syncprov ला वगळता, सर्व overlays वेगळ्याopenldap-servers-overlays संकुल अंतर्गत आढळले जातिल, व त्यांस गतिक दाखलनजोगी विभाग म्हणून कंपाइल केले जाते. syncprov overlay तात्पूर्ते OpenLDAP सर्वरशी जुळले गेले आहे व जुन्या OpenLDAP प्रकाशानशी सहत्वता जपून ठेवते.

  • xterm बायनरीने समुह ID (setgid) बीट संयोजीत केल्यामुळे, ठराविक वातावरण वेरीयेबल (such as LD_LIBRARY_PATHTMPDIR) पुन्ह स्थापीत केले गेले. या प्रकाशनात, xterm बायनरीची पद्धती आता 0755 नुरूप संयोजीत केले आहे, जे या अडचणीचे निर्धारण करते.

  • या प्रकाशनात एका पेक्षा जास्त मशीन ypbind शी NIS सर्वर वरील लोड हाताळणी करीता जुळवणी स्थापीत करण्याची सूचविलेली पदध्त आता बदलविली गेली आहे. ypbind डीमनचे वर्तन बदलविले गेले नाही: ते अजूनही /etc/ypbind संयोजना फाइल अंतर्गत दर्शविलेले सर्व NIS सर्वर करीता पींग करते व सर्वात जलदरित्या प्रतिसाद पुरविणाऱ्या सर्वरशी बांधणी करते. पूर्वी, प्रत्येक मशीन अंतर्गत /etc/ypbind.conf संयोजना फाइल मधिल उपलब्ध NIS सर्वरची यादी प्रदर्शीत करणे सूचविले जात असे. तरी, सर्वात जास्त लोड हाताळणी करणारे सर्वर देखिल जलदरित्या पींगला प्रतिसाद देऊ शकल्यामुळे, स्वत:च लोड वाढवून घेत असल्यामुळे, आता प्रशाकास प्रत्येक मशीनच्या ypbind.conf अंतर्गत उपलब्ध लहान NIS सर्वरची यादी दर्शविणे व ही यादी प्रतत्य मशीनशी जुळवूण पहाणे, सूचविले जाते..या तऱ्हेने प्रत्येक मशीन करीता संपूर्ण NIS सर्वर यादी उपलब्ध होत असल्यामुळे, NISसर्वर स्वयंरित्या लोड-हाताळणी करीता सज्ज होतोe.

  • OpenMotif ला अपस्ट्रीम आवृत्ती 2.3.1 करीता पुन्ह आधारीत करण्यात आले आहे. या अद्ययावतात अनेक बग निर्धारण समाविष्टीत आहे, मुख्यतया:

    • OpenMotif द्वारे GrabUngrab घटना हाताळणी संबंधित बगचे आता निर्धारण झाले आहे. पूर्वीच्या प्रकाशनात, या बगमुळे प्रदर्शन कुलूपबंद होत असे.

    • nedit चित्रलेखीय वापरकर्ता संवादचा वापर करतवेळी nedit अंतर्गत बग अनुप्रयोग क्रॅश करण्यास कारणीभूत ठरीत असे. वरील वग कोड अंतर्गत कार्यपद्धतीला घटक निवडतेवेळी segmentation fault आढळल्यामुळे होत असे, ज्यांस आता निर्धारीत करण्यात आले.

  • dbus आवृत्ती 1.1.2 नुरूप आधारीत केले गेले आहे. हे अद्ययावत dbus अंतर्गत डेडलॉकला कारणीभूत ठरणारे मल्टी-थ्रेडेड कार्यक्रमातील बगचे निर्धारण करते. पूर्वीच्या प्रकाशनात, एकच थ्रेड dbus कार्यक्रम चालवीत व संदेशचे विश्लेषण करीत असल्यामुळे, दुसरे थ्रेड dbus करीता संदेश पाठवेल.

  • strace आवृत्ती 4.5.18 करीता पुन्ह आधारीत केले गेले आहे. यामुळे अनेक बगचे निर्धारण शक्य आहे, मुख्यतया:

    • -f पर्याय कुठल्यातरी multi-threaded कार्यक्रमावर (ठराविकरित्या 64-बीट प्रणालीवर) चालविल्यास strace ला क्रॅश करणाऱ्या बगचे आता निर्धारण झाले आहे.

    • 32-बीट प्रणालीवर 64-बीट आवृत्तीचे strace ला vfork() कार्यपद्धती करीता कॉल करण्यापासून रोखणाऱ्या बगचे आता निर्धारण झाले आहे.

  • cpuspeed आवृत्ती 1.2.1-5 करीता सुधारीत केले गेले आहे. या अद्ययावतात, इतर विभागाचे दाखलन अपयशी ठरल्यास cpuspeed init सक्रीप्ट आता speedstep-centrino विभाग दाखल करते. याच्या व्यतिरीक्त, वापरकर्ता-केंद्रीत बग जे Powernow-k8 विभागास दाखलन पासून रोखत होते आता त्याचे निर्धारण करण्यात आले आहे.

  • frysk साधनचे संच या वितरण पासून पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. frysk Red Hat Enterprise Linux 5.0 अंतर्गत प्रथमक्षणी तंत्रज्ञाण पूर्वदृश्य नुरूप प्रस्तुत केले गेले होते.

  • पूर्वी, iostat -x आदेश द्वारे पुरविले गेलेले विभाजन I/O आकडेवारी अपूर्ण होते. या अद्ययावतात, विभाजन आकडेवारी आता डिस्क आकडेवारी नुरूप प्रमाणीत केले जाते, तसेच विभाजन स्तर करीता सुलभ व सहज समझण्याजोगी I/O आकडेवारी पुरविते.

  • Dovecot मेल सर्वर करीता संयोजना फाइल अंतर्गत गुप्तशब्द उघडकीस होण्याची समस्या आढळली. प्रणालीकडे ssl_key_password पर्याय निश्चित असल्यास, कुठलाही स्थानीय वापरकर्ता SSL कि गुप्तशब्द सहज पाहू शकेल. (CVE-2008-4870)

    Note

    ही समस्या दोषीय वापरकर्त्याला SSL कि चे अनुक्रम प्राप्त करण्यास परवानगी देत नाही. कि फाइल विना गुप्तशब्दचे मुल्य राहत नाही व वापरकर्त्यास त्याकरीता वाचनची परवानगी नसावी.

    या मुल्यची सुरक्षा उत्तमरित्या करण्याकरीता, तरी, dovecot.conf फाइल आता "!include_try" डीरेक्टीव्ह करीता समर्थन पुरविते. ssl_key_password पर्याय dovecot.conf पासून नविन फाइल करीता स्थानांतरीत केले पाहिजे व याची मालकी, वाचन व लेखन परवानगी, रूट (म्हणजेच 0600) नुरूप असायला हवे. या फाइल करीता संदर्भ dovecot.conf पासून !include_try /path/to/password/file पर्याय निश्चित करून यानुरूप असायला हवे.

7.2. x86_64 मांडणी

  • ksh यास आवृत्ती 2008-02-02 यानुरूप आधारीत केले गेले आहे. हे अद्ययावत मल्टी-बाइट अक्षर हाताळणी जोडते, अनेक कार्य संबंधित नियंत्रण अडचणींचे निर्धारण करते व अपस्ट्रीम पासून बरेच बग निर्धारण समाविष्टीत आहे. लक्षात ठेवा ksh करीता हे अद्ययावत वर्तमान स्क्रिप्ट सहत्वता जपून ठेवते.

7.3. s390x मांडणी

  • vmconvert बगने vmur साधन नोड (/dev/0.0.000c) वर योग्यरित्या कार्य करण्यापासून रोखले होते. यामुळे vmur साधन वरील डंप करीता प्रवेश प्राप्त करतेवेळी vmconvert अपयशी ठरतो व vmconvert: डंप फाइल उघडण्यास अपयशी! (परवानगी नाही) असे त्रुटी संदेश दर्शविले जाते. या प्रकाशनातील s390utils अद्ययावत या अडचणीचे निर्धारण करते.

  • mon_procd डीमन व mon_fsstatd डीमन करीता init स्क्रीप्ट व config फाइल s390utils संकुल अंतर्गत आढळले नाही. यामुळे हे डीमन बिल्ट व वापरले जाऊ शकले नाही. न आढळलेले फाइल या अद्ययावतात समाविष्ट करून या अडचणीचे निर्धारण केले गेले आहे.

7.4. PowerPC मांडणी

  • बग ज्यामुळे ehci_hcd विभागचे पुन्हदाखलन या मांडणीवर होत नव्हते आता त्यास निर्धारीत करण्यात आले आहे. यामुळे Belkin 4-port PCI-Express USB Lily अडॅप्टर (व यानुरूपच इतर साधन) आता ehci_hcd विभाग सह वापरल्यास Red Hat Enterprise Linux 5 अंतर्गत योग्यरित्या कार्य करते.

  • libhugetlbfs लायब्ररी आता आवृत्ती 1.3 करीता री-बेस केले गेले आहे. या अद्ययावतमुळे अनेक अपस्ट्रीम सुधारणा लायब्ररी करीता लागू होतात, ज्यामुळे अनुप्रयोगाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते जे Huge pages चा वापर करतात.

    libhugetlbfs करीता पूर्ण अद्ययावत यादी साठी, खालिल लिंक पहा:

    http://sourceforge.net/mailarchive/message.php?msg_name=20080515170754.GA1830%40us.ibm.com

  • Red Hat Enterprise Linux 5.2 अंतर्गत, httpd चे 64-बीट आवृत्ती httpd चे 32-बीट आवृत्तीच्या व्यतिरीक्त समाविष्ट केले गेले आहे. वापरकर्त्याने दोन्ही आवृत्ती प्रतिष्ठापीत केल्यास, httpd मतभेत आढळेल, व httpd ला योग्यरित्या कार्यान्वीत करण्यापासून रोखतो.

    या अडचणीचे निर्धारण करण्याकरीता, httpd चे 64-बीट आवृत्तीला या प्रकाशनातून काढून टाकण्यात आले. या प्रकाशन करीता httpd ला अद्ययावत केल्यास httpd चे 64-बीट आवृत्ती देखील काढून टाकली जाईल.

8. परिचीत अडचणी

8.1. सर्व मांडणी

  • नविन डिस्क एन्क्रीपशन गुणविशेषचा वापर रूट फाइल एन्क्रीप्ट करेतेवेळी, खालिल त्रुटी संदेश प्रणाली बंद करतेवेळी कन्सोलवर दर्शविले जईल:

    डिस्क एन्क्रीप्शन थांबवित आहे [अपयशी]

    हे संदेश सुरक्षीतरित्या वगळे जाऊ शकते, शटडाऊन कार्यपद्धती यशस्वीरित्या पूर्ण होईल.

  • एन्क्रीप्टेड साधनचा वापर करतेवेळी, खालिल त्रुटी संदेश बूटअपवेळी दर्शविले जाविले जाऊ शकते:

    insmod: '/lib/aes_generic.ko' जोडतेवेळी त्रुटी: -1 फाइल अस्तित्वात आहे
    हे संदेश सुरक्षाहेतु दुर्लक्षीत केले जाऊ शकते.

  • multipath सह Multiple Device (MD) RAID चे प्रतिष्ठापन केल्यास मशीन बूट होऊ शकत नाही. Multipath ते Storage Area Network (SAN) साधन जे आंतरीकरित्या RAID पुरविते प्रभावीत होत नाही.

  • मोठ्या प्रमाणात LUNs ला नोडशी जोडल्यास, multipath udev ला साधन नोड बनविण्याकरीता वेळ वाढवू शकतो. वरील अडचण आढळल्यास, /etc/udev/rules.d/40-multipath.rules अंतर्गत खालिल ओळ काढून टाकल्यास तुम्ही त्यास योग्य करू शकता:

    KERNEL!="dm-[0-9]*", ACTION=="add", PROGRAM=="/bin/bash -c '/sbin/lsmod | /bin/grep ^dm_multipath'", RUN+="/sbin/multipath -v0 %M:%m"
    ही ओळ udev ला दरवेळी ब्लॉक साधन नोड करीता जोडल्यास multipath चालविण्यास कारणीभूत ठरते. ही ओळ काढून टाकल्यावरही, multipathd स्वयंरित्या multipath साधन बनवितो, व बूट प्रक्रियावेळी multipathed रूट फाइलप्रणाली नोड करीता multipath ला कॉल केले जाईल. फरक एवढेच की multipathd कार्यरत नसतेवेळी multipath साधन स्वयंरित्या बनविले जाणार नाही, हे multipath वापरकर्ता करीता मोठी अडचण नसावी.

  • Red Hat Enterprise Linux च्या पूर्वीच्या आवृत्ती पासून 5.3 करीता सुधारणा करतेवेळी, तुम्हाला खालिल त्रुटी आढळतील:

    अद्ययावत करत आहे  : mypackage                 ################### [ 472/1655]
    rpmdb: mutex कुलूपबंद करू शकले नाही: अवैध बाब

    कुलूपबंद अडचणीचे कारण असे की glibc अंतर्गत सहभागीय futex कुलूपबंद पद्धत 5.2 व 5.3 अंतर्गत प्रत्येक-पद्धती futexes करीता सुधारीत करण्यात आली होती. यामुळे, 5.2 glibc विरूद्ध चालणारे कार्यक्रम सहभागीय futex कुलूपबंद पद्धत योग्यरित्या 5.3 glibc विरूद्ध चालणाऱ्या कार्यक्रमाशी कार्यान्वीत करू शकले नाही.

    ही ठराविक त्रुटी संदेश संकुल द्वारे अयोग्यरित्या rpm ला प्रतिष्ठापन स्क्रीप्टचे भाग म्हणून कॉल करण्याचे दुषपरिणाम आहे. सुधारणा कार्यरत करणारे rpm घटना पूर्ण सुधारणा अंतर्गत glibc च्या पूर्वीच्या आवृत्ती वापर करत आहे, परंतु स्क्रीप्ट अंतर्गत दाखल केलेले rpm घटना नविन glibc चा वापर करते.

    ही त्रुटी टाळण्याकरीता, glibc ला वेगळे रन अंतर्गत सुधारीत करा:

    # yum update glibc
    # yum update
    glibc ला पूर्वीचे प्रतिष्ठापीत 5.3 प्रणाली करीता डाऊनग्रेड केल्यास ही त्रुटी आढळेल.

  • mvapichmvapich2 Red Hat Enterprise Linux 5 अंतर्गत फक्त InfiniBand/iWARP आंतरीकजुळवणी करीता समर्थन पुरविते. यामुळे, ते इथरनेट किंवा इतर संजाळ जुळवणी वर चालणार नाही.

  • दोन पेक्षा जास्त एन्क्रीप्टेड ब्लॉक साधन असलेले प्रणाली करीता, anaconda कडे जागतिक गुप्तवाक्य पुरविण्याचा पर्याय आहे. init सक्रीप्ट, तरी, या गुणविशेष करीता समर्थन पुरवित नाही. प्रणाली बूट करतेवेळी , प्रत्येक एन्क्रीप्टेड साधन करीता गुप्तवाक्य प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

  • yum चा वापर करून openmpi करीता सुधारणा करतेवेळी, खालिल सावधानता दर्शविले जाऊ शकते:

    वाचन करीता `/tmp/openmpi-upgrade-version.*' उघडले जाऊ शकत नाही: फाइन किंवा संचयीका आढळली नाही
    संदेश हानीThe message is harmless and can be safely ignored.

  • IRQ SMP affinity संयोजीत केल्यास काहिक साधनवर प्रभाव याचा पडत नाही जे signalled interrupts (MSI) चा वापर विना MSI per-vector मास्कींग क्षमता सह करतात. या साधनाचे उदाहरण म्हणजे bnx2 ड्राइवरचा वापर करणारे Broadcom NetXtreme इथरनेट साधन.

    तुम्हाला अशा साधन करीता IRQ affinity संयोजीत करावे लागेल, /etc/modprobe.d/ अंतर्गत खालिल ओळ समाविष्टीत असलेले फाइलचे निर्माण करून MSI अकार्यान्वीत करा:

    options bnx2 disable_msi=1

    वैकल्पिकरित्या, कर्नल बूट घटक pci=nomsi चा वापर करून MSI यास पूर्णतया अकार्यान्वीत केले जाऊ शकते.

  • Dell PowerEdge R905 सर्वर वरील CD-ROM/DVD-ROM यूनीट Red Hat Enterprise Linux 5 वर कार्य करत नाही. अधिक माहिती करीता कृपया Knowledgebase #13121 पहा: http://kbase.redhat.com/faq/FAQ_103_13121.

    Important

    खालिल नुरूप प्रविष्ट Knowledgebase लेख मधिल पद्धतीमुळे GSS द्वारे समर्थीत न केले गेलेले इतर अडचणी करीता कारणीभूत ठरू शकते.

  • अद्ययावतीत /etc/udev/rules.d/50-udev.rules फाइल मधिल बग टेप साधनांकरीता ज्यांचे क्रमांक 9 पेक्षा जास्त आहे त्यांकरीता पक्के नाव बनविण्यापासून बंधिस्त करतो. उदाहरणार्थ, nst12 नाव रहीत टेप साधन करीता पक्के नाव बनविले जाणार नाही.

    यावर काम करण्याकरीता, /etc/udev/rules.d/50-udev.rules मधिल nst[0-9] च्या प्रत्येक आढळणी नंतर एस्टेरीस्क (*) जोडा.

  • smartctl साधन योग्यरित्या SATA साधन पासून SMART घटक वाचू शकत नाही.

  • openmpilam च्या पूर्वीच्या आवृत्ती मधिल बग तुम्हाला हे संकुल सुधारीत करण्यापासून रोखत असावे. हे बग खालिल त्रुटी मध्ये आढळते (openmpi or lam सुधारीत करण्याचा प्रयत्न करतेवेळी:

    त्रुटी: %preun(openmpi-[version]) scriptlet अपयशी, exit स्थिती 2

    तरी, अलिकडील आवृत्ती प्रतिष्ठापीत करण्याकरीता तुम्हाला openmpilam ची जुनी आवृत्ती प्रणालीतून बाहेर काढावी लागेल. हे करण्याकरीता, rpm आदेशचा वापर करा:

    rpm -qa | grep '^openmpi-\|^lam-' | xargs rpm -e --noscripts --allmatches

  • dm-multipath वापरतेवेळी, /etc/multipath.conf येथे गुणविशेष "1 queue_if_no_path" निर्देशीत केले असल्यास जोपर्यंत एक किंवा त्यापेक्षा जास्त मार्ग पुन्हसंचयीत केले जात नाही तोपर्यंत कुठलिही कार्यपध्दती जे I/O पुरविते लगेच अकार्यक्षम होईल.

    हे टाळण्याकरीता, /etc/multipath.conf मधिल no_path_retry [N] निश्चित करा (जेथे [N] म्हणजे प्रणालीने ठराविक मार्ग करीता पुन्हप्रयत्न केला तो एकूण वेळ). हे कार्यकरत करतेवेळी, /etc/multipath.conf मधिल गुणविशेष "1 queue_if_no_path" पर्याय काढूण टाका.

    "1 queue_if_no_path" चा वापर करत असल्यास व येथे दर्शविले नुरूप अडचणीचे अनुभव प्राप्त करण्याकरीता, रनटाइमवेळी ठराविक LUN (i.e. ज्याकरीता सर्व मार्ग अनुपलब्ध आहेत) करीता करार संपादीत करण्यासाठी dmsetup चा वापर करा.

    उदाहरणार्थ: dmsetup message [device] 0 "fail_if_no_path" चालवा, जेथे [device] multipath साधन नाव आहे (उ.दा. mpath2; मार्ग निश्चित करू नका) ज्याकरीत तुम्हाला करार "queue_if_no_path" पासून "fail_if_no_path" असे रूपांतरीत करावे लागेल.

  • समान कर्नल विभागाचे बहु प्रतिष्ठापीत आवृत्ती कार्यान्वीत करणे समर्थित नाही. याच्या व्यतिरिक्त, कर्नल विभाग आवृत्ती ज्या तऱ्हेने वाचले जाते त्या नुरूप समान कर्नल विभागाची जुनी आवृत्ती कार्यान्वीत होऊ शकते व बग करीता कारणीभूत ठरू शकते.

    Red Hat असे सूचविते की जेव्हा तुम्ही प्रतिष्ठापीत कर्नल विभागातील नविन आवृत्तीचे प्रतिष्ठापन करता तेव्हा, तुम्ही जुणी आवृत्ती सर्वप्रथम काढूण टाका.

  • IBM Bladecenter QS21 किंवा NFS रूट सह संयोजीत QS22 वरील kdump कार्यान्वीत केल्यास अपयशी ठरेल. हे टाळण्याकरीता, /etc/kdump.conf मधिल NFS डंप लक्ष्य निश्चित करा.

  • पूर्णतया सस्पेंड केल्यावर व डॉकींग स्टेशनशी जुळविल्यास IBM T60 लॅपटॉप पूर्णपणे बंद होईल. हे टाळण्याकरीता, प्रणालीस बाब acpi_sleep=s3_bios सह बूट करा.

  • IBM Bladecenter करीता QLogic iSCSI Expansion Card दोन्ही इथरनेट व iSCSI कार्यपध्दती पुरवितो. कार्डवरील काहीक भाग दोन्ही कार्यपध्दती द्वारे सहभागीये केले जाते. तरी, सद्याचे qla3xxxqla4xxx ड्राइवर इथरनेट व iSCSI कार्यपध्दती सहभागीय करतात. दोन्ही ड्राइवर इथरनेट व iSCSI कार्यपध्दतीचा वापर करीता समर्थन देत नाही.

    या मर्यादामुळे, वारंवार पुन्हसाथापन (परस्पर ifdown/ifup आदेश द्वारे) साधनास स्तब्ध करू शकते. हे टाळण्याकरीता, ifdown चालविण्यापूर्वी व ifup नंतर 10-सेकंदच्या अवधीस परवानगी द्या. पुढे, ifdown नंतर व ifup वापरण्यापूर्वी समान 10-सेकंदच्या अवधीस परवानगी द्या. ifup चालविल्या नंतर ही अवधी सुस्थीत व्हायला बराच वेळ देण्यास व सर्व कार्यपध्दतीस पुन्ह प्रारंभ करण्यास परवानगी देते.

  • Cisco Aironet MPI-350 बिनतारी कार्ड असलेले लॅपटॉप तारेवरील इथरनेट पोर्ट वापरून एखादे संजाळ-आधारित प्रतिष्ठापन करण्यादरम्यान DHCP पत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात हँग होऊ शकतात.

    यावर उपाय म्हणून, प्रतिष्ठापनेसाठी तुमचे स्थानिक माध्यम वापरा. वैकल्पिकरित्या, तुम्ही बिनतारी कार्ड प्रतिष्ठापनेपूर्वी लॅपटॉप BIOS मध्ये अकार्यान्वित करू शकता (प्रतिष्ठापनेनंतर तुम्ही बिनतारी कार्ड पुन्हा कार्यान्वित करू शकता).

  • Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्गत /var/log/boot.log करीता बूट-टाइम लॉगींग उपलब्ध नाही.

  • प्रणाली kexec/kdump कर्नलमध्ये यशस्वीरित्या रीबूट होणार नाही जर X चालू असेल आणि vesa ऐवजी अन्य ड्राइवर वापरत असेल. ही समस्या फक्त ATI Rage XL आलेखीय चिपसेटसह अस्तित्वात होते.

    ATI Rage XL धारी प्रणालीवर X चालत असेल, तर खात्री करा की तो kexec/kdump कर्नलमध्ये रीबूट करण्यासाठी vesa ड्राइवर यशस्वीरित्या वापरतो.

  • nVidia CK804 चिपसेट प्रतिष्ठापित असलेल्या मशीनवर Red Hat Enterprise Linux 5.2 वापरताना, तुम्हाला खालिलप्रमाणे कर्नल संदेश आढळू शकेल:

    कर्नल: assign_interrupt_mode ला MSI सक्षमता आढळले
    कर्नल: pcie_portdrv_probe->Dev[005d:10de] ला अवैध IRQ आढळले. विक्रेता BIOS तपासा

    हे संदेश विशिष्ट PCI-E पोर्ट IRQs करीता विनंती करत नाही हे दर्शविते. पुढे, याचा मशीनच्या कार्यपध्दतीवर कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम करत नाही.

  • सहजरीत्या काढूशकणाऱ्या संचयन साधण (उदाहणार्थ CDs व DVDs) काहीवेळा आपण रूट द्वारे प्रवेशकेल्यावर आपोआप माउंट होत नाही. तरी, आपल्याला छायाचित्राद्वारे फाइल व्यवस्थापक च्या मदतीने साधण माउंट करावे लागेल.

    याच्या व्यतिरिक्त, साधणास /media वरील माउंट करण्याकरीता आपण खालिल आदेशचा वापर करू शकता:

    mount /dev/[device name] /media
  • संचयीत फाईलरवरील, LUN ला काढून टाकल्यास, यजमानात हे बदल परस्पर आढळूण येत नाही. या स्तिथीत, lvm आदेश dm-multipath वापरतेवेळी सक्रीय राहणार नाही, तरी यावेळी LUN अकार्यक्षम झाले आहे.

    यावर काम करण्याकरीता, सर्व साधणे व /etc/lvm/.cache मधिल LUN करीता mpathवरील नोंदणीकृत लिंक काढून टाका.

    नोंदणीकृत विषयी अधिक माहिती करीता, खालिल आदेशचा वापर करा:

    ls -l /dev/mpath | grep [stale LUN]

    उदाहणार्थ, [stale LUN] 3600d0230003414f30000203a7bc41a00 असल्यास, खालिल परिणाम आपणास दिसू शकतील:

    lrwxrwxrwx 1 root root 7 Aug  2 10:33 /3600d0230003414f30000203a7bc41a00 -> ../dm-4
    lrwxrwxrwx 1 root root 7 Aug  2 10:33 /3600d0230003414f30000203a7bc41a00p1 -> ../dm-5

    याचा अर्थ 3600d0230003414f30000203a7bc41a00 mpath दोन लिंक्स करीता निश्चित केले आहे: dm-4dm-5.

    तरी, /etc/lvm/.cache पासून खालिल ओळी पुसून टाकण्यात यावे:

    /dev/dm-4 
    /dev/dm-5 
    /dev/mapper/3600d0230003414f30000203a7bc41a00
    /dev/mapper/3600d0230003414f30000203a7bc41a00p1
    /dev/mpath/3600d0230003414f30000203a7bc41a00
    /dev/mpath/3600d0230003414f30000203a7bc41a00p1
  • मार्ग ब्लॉकींग साधनावर स्थित असल्यास multipath आदेश -ll पर्यायसह चालविल्याने आदेश स्तब्ध होऊ शकतो. लक्षात घ्या साधनातर्फे प्रतिसाद न प्राप्त झाल्यास ड्राइवर विनंती नकारत नाही.

    हे क्लीनअप कोड द्वारे निर्माण होते, जे मार्ग तपासकर्ता विनंती यशस्वी किंवा अपयशी ठरेपर्यंत प्रतिक्षेत राहते. सद्याची multipath स्थिती दर्शविण्याकरीता आदेश स्तब्ध न करता, multipath -l त्याएवजी वापरा.

  • pm-utils याचे Red Hat Enterprise Linux 5.2 Beta आवृत्ती पासून pm-utils सुधारणा अपयशी होईल, व खालिल त्रुटी आढळेल:

    त्रुटी: फाइल /etc/pm/sleep.d: cpio: rename येथे संग्रह उघडू शकले नाही

    हे टाळण्याकरीता, /etc/pm/sleep.d/ संचयीका सुधारीत करण्यापूर्वीच काढूण टाका. /etc/pm/sleep.d मध्ये कुठलिही फाइल समाविष्टीत असल्यास, तुम्ही त्या फाइलला /etc/pm/hooks/ येथे हलवू शकता.

  • Mellanox MT25204 करीता हार्डवेअर चाचणी मध्ये ठराविक उच्च-लोड स्थितीवेळी आंतरीक त्रुटी आढळली आहे असे स्पष्टरूपी दिसून येचे. जेव्हाib_mthca ड्राइवर या हार्डवेअर करीता घातक त्रुटी दर्शवितो, तेव्हा, वापरकर्ता अनुप्रयोग द्वारे निर्मीत कार्य विनंतीची संख्या व अपुरे पूर्णत्व रांग तीव्रताशी जुळविले जाते.

    जरी ड्राइवर हार्डवेअरला पुन्हनिश्चित करतो व घटना पासून पुन्हप्राप्त होतो, सर्व जुळवणी त्रुटीवेळी लुप्त होतात. यामुळे सहसा वापरकर्ता अनुप्रयोग मध्ये विभागीय अडचणीस कारणीभूत ठरते. पुढे, त्रुटीच्यावेळी opensm कार्यरत असल्यास, योग्यरित्या कार्यपध्दती स्थापीत करण्याकरीता त्यास पुन्हा सुरू करावे लागेल.

  • Red Hat Enterprise Linux 5 यास अतिथीवर प्रतिष्ठापीत करतेवेळी, अतिथीला dom0 द्वारे पुरविले गेलेले तात्पुरते प्रतिष्ठापन कर्नल वापरण्यास संयोजीत केले जाते. एकदाचे प्रतिष्ठापन पूर्ण झाल्यावर, स्वतःचे बूटलोडरचा वापर केला जाऊ शकतो. तरी, हे guest'चे प्रथम रिबूट शटडाऊन विना शक्य नाही.

    तरी, रिबूट बटण अतिथी प्रतिष्ठापनच्या अखेरेस आढळल्यास, त्यावर क्लिक केल्यास अतिथी बंद होतो, परंतु रिबूट होत नाही. हे अपेक्षीत वर्तन आहे.

    लक्षात ठेवा अतिथीस यानंतर बूट केल्यावर स्वतःचे बूटलोडरचा वापर करते.

  • कुठलेही KDE किंवा qt विकास संकुल (उदाहरणार्थ, qt-devel) प्रतिष्ठापीत केल्यास, rpmbuild ला compiz स्त्रोत RPM वर चालविणे अपयशी ठरेल. हे सहसा compiz संयोजना स्क्रिप्ट अंतर्गत बगमुळे होते.

    यावर उपाय म्हणून, कुठलेही KDE किंवा qt विकास संकुल स्त्रोत RPM पासून compiz संकुल बिल्ड् करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी काढून टाका.

  • प्रणालीवर ATI Radeon R500 किंवा R600 चित्रलेखीय कार्ड संयोजीत असल्यास, firstboot प्रतिष्ठापन नंतर कार्य करणार नाही. प्रणाली प्रत्यक्षरित्या चित्रलेखीय दाखलन पडदा येथे जाते व firstboot पूर्णतया वगळते. firstboot स्वयंरित्या चालवायचे असल्यास (म्हणजेच failsafe टर्मिनल पासून), X सत्र क्रॅश होईल.

    ही अडचण ATI Radeon R500/R600 हार्डवेअर द्वारे निर्मीत ड्राइवरमुले होते. चित्रलेखीय कार्ड द्वारे वापरले गेलेले मुलभूत ड्राइवर अजूनही तंत्रज्ञाण पूर्वदृश्य म्हणून वापरले जाते. यावर उपाय म्हणून, /etc/X11/xorg.conf फाइलचे बॅकअप करा; त्यानंतर, X संयोजीत करण्याकरीता समर्थीत vesa ड्राइवरचा वापर खालिल आदेशचा वापर करून करा:

    system-config-display --reconfig --set-driver=vesa

    तुम्ही firstboot चालवू शकता. मागच्या संयोजनाकडे जाण्याकरीता, मुळ /etc/X11/xorg.conf संयोजना संचयीत करा.

  • प्रणाली TSC टाइमरचा वापर करत असल्यास, gettimeofday प्रणाली कॉल पाठीमागे हलवू शकते. हे सहसा overflow अडचणीमुळे होते जे TSC टाइमरला ठराविक घटना अंतर्गत पुढे जाण्याकरीता कारणीभूत ठरू शकते; असे झाल्यास, TSC टाइम स्वयं नुरूप सुस्थीत करतो, परंतु अखेरेस वेळेच्या दृष्टीकोणातून पाठीमागे जाते.

    ही अडचण सहसा ठराविक वेळ-केंद्रीत प्रणाली करीता गंभीर ठरते, जसे की कार्यपद्धती प्रणाली व माहितीकोष नुरूप प्रणाली. तरी, प्रणालीस प्रीसीशन टाइमींगची आवश्यकता असल्यास, Red Hat तुम्हाला इतर टाइमर (उदाहरणार्थ, HPET) चा उपयोग करण्याकरीता कर्नल स्थापीत करण्यास सूचवितो.

  • sniff चालविण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्रुटी आढळेल. याचे कारण असे की काहिक आवश्यक संकुल dogtail सह प्रतिष्ठापीत केले गेले नाही.

    हे टाळण्याकरीता, खालिल संकुल प्रतिष्ठापीत करा:

    • librsvg2

    • ghostscript-fonts

    • pygtk2-libglade

  • Thin Provisioning (यास "virtual provisioning") असे ही म्हटले जाते) प्रथमवेळी EMC Symmetrix DMX3DMX4 सह प्रकाशीत केले जातील. कृपया अधिक माहिती करीता EMC Support MatrixSymmetrix Enginuity कोड प्रकाशन टिप पहा.

  • /etc/multipath.conf अंतर्गत, max_fds यास unlimited असे निश्चित केल्यास multipathd डिमनला योग्यरित्या प्रारंभ करण्यास रोखू शकते. तरी, या संयोजना करीता जास्त मुल्यचा वापर करणे त्याऐवजी सूचविले जाते.

  • SystemTap वर्तमानक्षणी GCC चा वापर वापरकर्ता-केंद्रीत घटना शोधण्याकरीता करतो. GCC, तरी, घटक करीता योग्य स्थान यादी माहितीसह डीबगर पुरवत नाही.काहिक घटना मध्ये, GCC काहिक घटक प्रदर्शित करण्यास अपयशी ठरतो. ज्यामुळे, SystemTap सक्रीप्ट जे वापरकर्ता-क्षेत्र करीता शोध घेतात अयोग्य प्रमाण पुरवू शकतात.

  • IBM T41 लॅपटॉप मॉडेल सस्पेंड पद्धती येथे योग्यरित्या प्रवेश करत नाही; तरी, सस्पेंड पद्धती बॅटरीचा वापर सर्वसाधारपणे करेल. याचे कारण असे की Red Hat Enterprise Linux 5 अजूनही radeonfb विभाग समाविष्ट करत नाही.

    यावर उपाय म्हणून, hal-system-power-suspend नामांकीत स्क्रीप्ट खालिल ओळ समाविष्टीत असलेले /usr/share/hal/scripts/ येथे जोडा:

    chvt 1
    radeontool light off
    radeontool dac off

    ही स्क्रीप्ट याची खात्री करते की IBM T41 लॅपटॉप सस्पेंड पद्धती येथे योग्यरित्या प्रवेश करतो. प्रणाली योग्यरित्या सर्व कार्यपद्धती पुन्हा कार्यान्वीत करते याची खात्री करण्याकरीता, खालिल ओळ समाविष्टीत असलेले restore-after-standby स्क्रीप्ट, त्याच संचयीका अंतर्गत जोडा:

    radeontool dac on
    radeontool light on
    chvt 7
  • edac विभाग दाखल केल्यास, BIOS स्मृती कळविणे कार्य करणार नाही. याचे कारण असे की स्मृती त्रुटी कळविण्याकरीता BIOS द्वारे वापरले गेलेले रेजिस्टर edac विभाग नष्ट करतो.

    वर्तमान Red Hat Enterprise Linux Driver Update Model कर्नलला मुलभूतरित्या उपलब्ध सर्व विभाग (edac विभाग समाविष्टीत) दाखल करण्यास सूचना देतो. प्रणालीवर BIOS स्मृती कळविण्याकरीता खात्री करायची असल्यास, तुम्हाला स्वत: edac विभाग काढून टाकावे लागेल. असे करण्याकरीता, खालिल ओळ /etc/modprobe.conf येथे जोडा:

    blacklist edac_mc
    blacklist i5000_edac
    blacklist i3000_edac
    blacklist e752x_edac
  • Red Hat Enterprise Linux 5.3 अंतर्भूतीत ब्लॉक साधनातील वाढ किंवा कमी होणे ऑनलाइन स्वरूपात ओळखू शकतो. तरी, साधनाचे आकार बदलविले गेले हे ओळखण्याकरीता कुठलिही कार्यपद्धती नाही, त्यामुळे यांस ओळखण्याकरीता व त्या साधनावरील कुठल्याही फाइल प्रणाली करीता मानवीय पद्धतींची आवश्यकता आहे. पुन्ह आकाराचे ब्लॉक साधन आढळल्यास, प्रणाली लॉग मध्ये खालिल नुरूप संदेश आढळते:

    VFS: बदलविलेले मिडीया किंवा पुन्ह आकाराचे sdi वरील व्यस्थ inodes

    ब्लॉक साधन वाढविल्यास, हे संदेश सुरक्षितरित्या वगळले जाऊ शकते. तरी, प्रथमवेळी ब्लॉक साधन वरील कुठलिही माहिती संच संकुचीत न करता ब्लॉक साधन संकुचीत केल्यास, साधनवरील माहिती सदोषीत ठरविली जाऊ शकते.

    पूर्णतया LUN (किंवा ब्लॉक साधन) वरील बनविले गेलेले फाइलप्रणालीचे ऑनलाइन पुन्हआकार शक्य आहे. ब्लॉक साधन येथे पार्टीशन टेबल आढळल्यास, पार्टीशन टेबल अद्ययावतीत करण्याकरीता फाइल प्रणाली अनारोहीत करावे लागेल.

  • प्रणालीवर GFS2 फाइल प्रणाली आरोहीत असल्यास, नोड अंतर्गत कॅश्ड् inode करीता प्रवेश प्राप्त केल्यास व इतर नोड करीता जुळवणी मोडल्यास, नोड स्तब्ध होऊ शकतो. असे झाल्यास, स्तब्ध नोड अनुपलब्ध तोपर्यंत स्तब्ध राहते जोपर्यंत त्यास सर्वसाधारण क्लस्टर प्राप्य पद्धती द्वारे फेंस व पुन्ह प्राप्त करत नाही. कार्यपद्धती कॉल gfs2_dinode_deallocshrink_dcache_memory स्तब्ध नोड अंतर्गत अडकलेले पद्धतीच्या स्टॅक ट्रेस् अंतर्गत देखिल दर्शविले जाईल.

    या अडचनमुळे single-node GFS2 फाइल प्रणालीवर प्रभाव पडत नाही.

  • प्रणाली बूटवेळी खालिल संदेश दर्शविले जाईल:

    स्थिरता शोधत आहे, 10 सेकंद करीता प्रतिक्षा केले.
    सर्व प्रत्यक्ष खंड वाचत आहे.  यास जरा वेळ लागू शकतो...
    कर्नलने सर्व डिस्कची पहाणी केली आहे याची खात्री करण्याकरीता हा विलंब (ज्यांस 10 सेकंद करीता निश्चित केले जाऊ शकते, हार्डवेअर संयोजनावर अवलंबून) आवश्यक आहे.

  • ipmitool अंतर्गत वापरकर्ता पेलोड प्रवेश चे वर्तमान लागूकरण तुम्हाला साधन संयोजीत करण्यास परवानगी देते, परंतु साधन करीता वर्तमान संयोजना प्राप्त करण्यास सुविधा पुरवित नाही.

  • swap --grow घटकाचा किकस्टार्ट फाइल अंतर्गत वापर केल्यास व तेही --maxsize घटकास त्याचवेळी संयोजीत न करता anaconda वर swap विभाजनचे कमाल आकार अशी मर्यादा लागू केली जाते. ते साधन पूर्ण भरण्यास परवानगी देत नाही.

    2GB पेक्षा कमी प्रत्यक्ष स्मृती असलेले प्रणाली करीता, लागू केलेली मर्यादा प्रत्यक्ष स्मृतीच्या दुप्पट आहे. 2GB पेक्षा जास्त प्रणाली करीता, लागू केलेली मर्यादा प्रत्यक्ष स्मृती आकार व 2GB अशी एकूण आकार असते.

  • gfs2_convert कार्यक्रम GFS मेटाडेटा अंतर्गत GFS2 द्वारे वापरणीत नसलेले सर्व ब्लॉक बहुदा मोकळे करणार नाही. या मेटाडेटा ब्लॉक करीता शोध घेतला जाईल व पुढच्यावेळी gfs2_fsck फाइल प्रणालीवर चालविल्यावर मोकळे केले जाईल. फाइलप्रणाली मोकळे विनावापरलेले ब्लॉक करीता रूपांतरीत केल्यानंतरच gfs2_fsck चा वापर कराव असे सूचविले जाते. हे न वापरलेले ब्लॉक gfs2_fsck द्वारे चिन्हाकृत केले जातिल व नुरूप संदेश दर्शविले जातिल:

    Ondisk व fsck बीटमॅप ब्लॉक 137 (0x89) करीता वेगळे होतात 
    Ondisk स्तिथी 1 (Data) आहे परंतु FSCK ते 0 (Free) आहे असे वाटते
    Metadata प्रकार 0 (free) आहे
    हे संदेश GFS2 फाइल प्रणली अंतर्गत सदोष दर्शवित नाही, ते फक्त ब्लॉक जे मोकळे व्हायला हवे होते व कुठल्या कारणास्तव झाले नाही, एवढेच दर्शविते. मोकळे करण्याजोगी ब्लॉकची संख्या वेगळे असू शकते व फाइल प्रणाली आकार तसेच ब्लॉक आकार यावर अवलंबून राहते. अनेक फाइल प्रणली करीता ही अडचण आढळणार नाही. मोठ्या फाइल प्रणलीस लहान ब्लॉक संख्या (सहसा 100 पेक्षा कमी) असू शकते.

8.2. x86 मांडणी

  • बेअर-मेटल (आभासी नसलेला) कर्नल कार्यरत असतेवेळी, मॉनीटरपासून X सर्वर EDID माहीती मिळवू शकत नाही. हे झाल्यास, छायाचित्र ड्राइवर 800x600 पेक्षा जास्त रेझल्यूशन दर्शविण्यास असमर्थ ठरतो.

    यावर काम करण्यासाठी, /etc/X11/xorg.conf विभागास ServerLayout ही खालिल ओळ समाविष्टीत करा:

    पर्याय "Int10Backend" "x86emu"
  • रेकॉर्डींग स्वयंरित्या Dell M4300M6300 येथे कार्यान्वीत केले गेले पाहिजे. असे कार्यान्वीत करण्याकरीता, खालिल पद्धती कार्यान्वीत करा:

    1. alsamixer उघडा.

    2. पहा गुणविशेष (मेन्यूच्या वरील उजव्या बाजूस स्थीत) अंतर्गत टॉगल [प्राप्त] करण्याकरीता टॅब दाबा.

    3. Space पट्टी दाबा.

    4. रेकॉर्डींग कार्यान्वीत आहे याची तपासणी करण्याकरीता, ADCMux गुणविशेष वरील पाठ्यने L R CAPTUR दर्शविले पाहिजे.

  • प्रणाली प्रतिष्ठापनवेळी एन्क्रीपशन कार्यान्वीत केले असल्यास, प्रणाली बूटवेळी खालिल संदेश दर्शविले जाईल:

    padlock: VIA PadLock आढळले नाही.
    हे संदेश सुरक्षितरीत्या दुर्लक्षीत केले जातिल.

8.3. x86_64 मांडणी

  • काही मशीनी ज्या NVIDIA आलेखी कार्ड वापरतात त्या भ्रष्ट आलेखी किंवा फॉन्ट दाखवू शकतात आलेखी प्रतिष्ठापक वापरताना किंवा आलेखीय लॉगीनदरम्यान. यावर उपाय म्हणून, आभासी कन्सोलवर स्विच करा आणि परत मूळ X यजमानावर या.

  • IBM T61 लॅपटॉपवर, Red Hat तुम्हाला glxgears चौकट क्लिक करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते (glxgears चालविल्यानंतर). असे केल्यास प्रणाली लॉक होऊ शकते.

    हे घडण्यापासून रोखण्याकरीता, टाइलींग गुणविशेष अकार्यान्वीत करा. यासाठी, /etc/X11/xorg.conf अंतर्गत Device विभागात खालिल ओळ जोडा:

    पर्याय "Tiling" "0"
  • रेकॉर्डींग स्वयंरित्या Dell M4300M6300 येथे कार्यान्वीत केले गेले पाहिजे. असे कार्यान्वीत करण्याकरीता, खालिल पद्धती कार्यान्वीत करा:

    1. alsamixer उघडा.

    2. पहा गुणविशेष (मेन्यूच्या वरील उजव्या बाजूस स्थीत) अंतर्गत टॉगल [प्राप्त] करण्याकरीता टॅब दाबा.

    3. Space पट्टी दाबा.

    4. रेकॉर्डींग कार्यान्वीत आहे याची तपासणी करण्याकरीता, ADCMux गुणविशेष वरील पाठ्यने L R CAPTUR दर्शविले पाहिजे.

  • प्रणाली Intel 945GM चित्रलेखीय कार्डचा वापर करत असल्यास, i810 ड्राइवरचा वापर करू नका. त्या ऐवजी intel ड्राइवरचा मुलभूतरित्या वापर करा.

  • dual-GPU लॅपटॉप वरील, एकही चित्रलेखीय चीप Intel-आधारीत असल्यास, Intel चित्रलेखीय पद्धती बाहेरील डिजीटल जुळवणीशी (HDMI, DVI, व DisplayPort समाविष्टीत) संलग्न राहणार नाही. हे Intel GPU ची हार्डवेअर मर्यादा आहे. बाहेरील डिजीटल जुळवणी स्थापीत करायचे असल्यास, प्रणालीला discrete graphics चीपसह (BIOS अंतर्गत) संयोजीत करा.

8.4. PowerPC मांडणी

  • त्रुटीनिवारणासाठी Alt-SysRq-W वापरताना, खालिल सुचना संदेश दिसेल:

    arch/powerpc/kernel/smp.c:223 येथे अयोग्य smp_call_function आढळले

    नंतर, प्रणाली ती हँग होण्याची सुचनादेखील देईल. हा संदेश दुर्लक्षित करावा कारण प्रणाली यामुळे हँग होणार नाही.

  • रेकॉर्डींग स्वयंरित्या Dell M4300M6300 येथे कार्यान्वीत केले गेले पाहिजे. असे कार्यान्वीत करण्याकरीता, खालिल पद्धती कार्यान्वीत करा:

    1. alsamixer उघडा.

    2. पहा गुणविशेष (मेन्यूच्या वरील उजव्या बाजूस स्थीत) अंतर्गत टॉगल [प्राप्त] करण्याकरीता टॅब दाबा.

    3. Space पट्टी दाबा.

    4. रेकॉर्डींग कार्यान्वीत आहे याची तपासणी करण्याकरीता, ADCMux गुणविशेष वरील पाठ्यने L R CAPTUR दर्शविले पाहिजे.

  • PPC कर्नल प्रतिमाचे आकार OpenFirmware करीता समर्थनसाठी खूपच मोठे आहे. यामुळे, संजाळ बूट पद्धती अपयशी ठरते, व खालिल त्रुटी संदेश दर्शविले जाते:

    कृपया थांबा, कर्नल दाखल होत आहे...
    /pci@8000000f8000000/ide@4,1/disk@0:2,vmlinux-anaconda: फाइल किंवा संचयीका अस्तित्वात नाही
    boot: 
    यावर उपाय करीता:
    1. IBM स्पलॅश पडदा दर्शविल्यानंतर '8' कि दाबल्यावर, OpenFirmware प्रॉमप्ट पासून बूट करा.

    2. खालिल आदेश चालवा:

      setenv real-base 2000000

    3. खालिल आदेशचा वापर करून System Managment Services (SMS) अंतर्गत बूट करा:

      0
      > dev /packages/gui obe

8.5. s390x मांडणी

  • 2GB पेक्षा जास्त अतिथी संचयन निश्चित असलेल्या z/VM येथे Red Hat Enterprise Linux 5.2 चालवितेवेळी, QDIO पद्धतीत Queued-I/O assist (QIOASSIST) पर्याय कार्यान्वीत असल्यास, कुठल्याही FCP व OSA साधन पासून अवैध माहितीचे वाचन किंवा लेखन शक्य होईल. प्रणालीस अशा प्रकारचे साधन जोडले असल्यास, Red Hat तुम्हाला खालिल लिंक पासून परस्पर z/VM Program Temporary Fix (PTF) डाऊनलोड व प्रतिष्ठापन करायला सूचविते:

    http://www-1.ibm.com/support/docview.wss?uid=isg1VM64306

  • z/VM डंप ला फाइल मध्ये प्रत्यक्षरित्या वाचण्याजोगी व रूपांतर करीता सज्ज करणे शक्य नाही. त्याऐवजी, तुम्ही सर्वप्रथम z/VM वाचक पासून डंप Linux फाइल प्रणाली मध्ये vmur चा वापर करून प्रतिकृत करायला हवे व vmconvert चा वापर करून डंपला Linux-वाचण्याजोगी फाइल मध्ये रूपांतरीत करा.

  • IBM System z पारंपारिक Unix-शैलीचा भौतिक कन्सोल पुरवत नाही. यामुळे, IBM System z साठी Red Hat Enterprise Linux 5.2 प्रारंभिक कार्यक्रम भारणावेळी firstboot कार्यशीलता समर्थित करत नाही.

    IBM System z वर Red Hat Enterprise Linux 5.2 योग्यरित्या व्यवस्थित करण्यासाठी, प्रतिष्ठापनेनंतर खालिल आदेश चालवा:

    • /usr/bin/setup -- setuptool संकुल द्वारे पुरविलेले आहे.

    • /usr/bin/rhn_register -- rhn-setup संकुल द्वारे पुरविलेले आहे.

8.6. ia64 मांडणी

  • काहिक Itanium प्रणाली kexec purgatory कोड पासून कंसोल योग्यरित्या बनवू शकत नाही. या कोड मध्ये क्रॅश नंतरचे पहिले 640k स्मृती समाविष्टीत असते.

    त्याचवेळी purgatory कंसोल आउटपुट अडचणी तपासण्याकरीता उपयोगी ठरू शकतो, व त्यामुळे kdump योग्यरित्या कार्यरत असणे आवश्यक नाही. तरी, तुम्हची Itanium प्रणाली kdump कार्यरत असतेवेळी पुन्हस्थापीत होत असल्यास,purgatory मधिल कंसोल आउटपुट /etc/sysconfig/kdump मधिल KEXEC_ARGS गुणांक करीता --noio जोडून अकार्यान्वीत करा.

  • वेगळे CPU वेग आढळल्यास perftest चालविल्यावर अपयशी ठरेल. तरी, perftest चालविण्यापूर्वी CPU वेग प्रमाणीत केले पाहिजे.

  • kdump कर्नल बूट केल्यावर, खालिल त्रुटी बूट लॉग अंतर्गत दर्शविली जाईल:

    mknod: /tmp/initrd.[numbers]/dev/efirtc: अशी कुठलिही फाइल किंवा संचयीका आढळली नाही

    ही त्रुटी अयोग्य मार्ग वरील efirtc च्या निर्माण करण्या संबंधि सदोषीत विनंतीमुळे होते. तरी, गृहीतजोगी साधन मार्ग तात्पुरर्ते kdump सेवा चालू केल्यावर initramfs अंतर्गत बनविले जाते. तरी, साधन नोडचे रन-टाइम निर्माण अगाऊ, हानीरहीत, व kdump ची कार्यक्षमतेवर प्रभाव न पाडणारे यानुरूप असावे.

  • काहिक प्रणाली kdump कर्नलला योग्यरित्या बूट करत नाही. या परिस्थीत, machvec=dig कर्नल घटकचा वापर करा.

  • रेकॉर्डींग स्वयंरित्या Dell M4300M6300 येथे कार्यान्वीत केले गेले पाहिजे. असे कार्यान्वीत करण्याकरीता, खालिल पद्धती कार्यान्वीत करा:

    1. alsamixer उघडा.

    2. पहा गुणविशेष (मेन्यूच्या वरील उजव्या बाजूस स्थीत) अंतर्गत टॉगल [प्राप्त] करण्याकरीता टॅब दाबा.

    3. Space पट्टी दाबा.

    4. रेकॉर्डींग कार्यान्वीत आहे याची तपासणी करण्याकरीता, ADCMux गुणविशेष वरील पाठ्यने L R CAPTUR दर्शविले पाहिजे.

  • SELinux enforcing पद्धती कार्यान्वीत असलेले Intel Itanium-आधारीत प्रणलीवर, IA-32 Execution Layer (the ia32el service) ला योग्यरित्या कार्यान्वीत करण्याकरीता allow_unconfined_execmem_dyntrans किंवा allow_execmem Booleans कार्यान्वीत केले गेले पाहिजे. allow_unconfined_execmem_dyntrans Boolean अकार्यान्वीत केले असल्यास, व allow_execmem Boolean कार्यान्वीत असल्यास, जे Red Hat Enterprise Linux 5 अंतर्गत मुलभूतरित्या संयोजीत असते, ia32el सेवा 32-बीट एम्यूलेशन करीता समर्थन पुरविते; तरी, दोन्ही Booleans अकार्यान्वीत असल्यावर, एम्यूलेशन अपयशी ठरते.

A. आवृत्ती इतिहास

Revision History
Revision 1.016th October 2008Ryan Lerch